Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime NewsSaam tv

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! अनैतिक संबंधातून एकाचा खून; मामा- भाच्याला अटक

Crime News Update: आणखी दोन आरोपींना लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
Published on

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar Crime News: अनैतिक संबंधातुन एकाचा खून झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड येथे उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आणखी दोघांना लवकरच अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Crime News In Marathi)

Sambhajinagar Crime News
Palghar Rain News: पावसामुळे पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, रेनुकाबाई मेहर यांनी 15 जुन 2023 रोजी आपला पती राजू बाबुलाल महेर यांची मिसींग तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल केली होती. ही तक्रार झाल्यानंतर सायबर सेल औरंगाबद यांच्या मदतीने पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली.

यावेळी पोलिस तपासात राजू मेहेरचा अनैतिक संबंधातून खुन झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींनी 4 जून 2023 रोजी राजु महेर याचा खुन केला. तसेच मृतदेह अजिंठा घाटात फेकुन दिला होता. पोलिसांनी शोध घेतला असत त्यांना कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.

Sambhajinagar Crime News
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबलं; मृतांची संख्या २२ वर, अद्याप १०७ बेपत्ता

या घटनेतील आरोपी गणेश महेताब महेर आणि करण नारायण बारवाल या मामे भाचे दोघांना अटक केली आहे. तसेच आणखी दोन आरोपींना लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, रात्री उशिरा पर्यंत कारवाई सुरु होती. या संपुर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com