मोठी बातमी! छगन भुजबळ दिल्लीला जाणार? फडणवीस सरकारमध्ये 'या' नेत्याला मिळणार संधी? महत्त्वाची अपडेट समोर

Chhagan Bhujbal Rajya Sabha : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिक्त राज्यसभा जागेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. भुजबळ दिल्लीला गेल्यास त्यांच्या जागी समीर भुजबळ यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Maharashtra Minister Chhagan Bhujbal
Maharashtra Minister Chhagan Bhujbal Saam Tv
Published On

Chhagan Bhujbal Samir Bhujbal latest news : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या गोटातून आता राज्यसभेच्या रिक्त जागेवरून मोठ्या राजकीय घडामोडी समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रिक्त झालेल्या या जागेवर पक्षाच्याच एखाद्या वरिष्ठ नेत्याला संधी मिळावी, असं मत व्यक्त केलं आहे. साम टीव्हीला दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचं नाव राज्यसभेसाठी जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या रिक्त जागेवर पक्षातीलच एखाद्या वरिष्ठ नेत्याला संधी मिळावी, असं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेवर १८ तारखेला मतदान होणार आहे. त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भुजबळ यांच्या नावाचा विचार केला जात आहे.

Maharashtra Minister Chhagan Bhujbal
भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

समीर भुजबळ यांना मंत्रिपद मिळणार?

छगन भुजबळ दिल्लीत गेल्यास राज्यात त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार, याबाबतही आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. छगन भुजबळ यांच्या जागी समीर भुजबळ यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात यावं, या संदर्भात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर खलबतं आणि चर्चा सुरू आहेत. त्यामुळे छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास समीर भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Minister Chhagan Bhujbal
Crime News : शिंदेसेनेच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा; गुंगीचे औषध देऊन अत्याचार, व्हिडीओ काढून केलं ब्लॅकमेल

नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील राजकीय पकड मजबूत ठेवण्यासाठी समीर भुजबळ यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद देणं फायद्याचं ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर सध्या खलबतं आणि जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यामुळे छगन भुजबळ खरोखरच दिल्लीत जाणार का आणि त्यांच्या जागी समीर भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Minister Chhagan Bhujbal
Pune : महिलेने यात्रेतून खरेदी केली चादर; घरी जाऊन घडी उलगडताच पायाखालची जमीन सरकली, पाहा नक्की काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com