Maharashtra Politics : आगामी निवडणुकीसाठी भाजप सज्ज; कमळ फुलवण्यासाठी कोणता प्लान आखला?

Maharashtra Political News : आगामी निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. भाजपने कमळ फुलवण्यासाठी कोणता प्लान आखला? जाणून घेऊयात.
bjp Politics
BJP flag Saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने बैठकांचा सापटा लावला आहे. आगमी निवडणुका एप्रिल, मे महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे महायुतीमधील भाजपने आगामी निवडणुकीसाठी राजकीय रणनिती आखायला सुरुवात केली आहे. आज पुण्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीची भाजपची रणनिती सांगितली.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'पुणे महानगरपालिका निवडणुकीत कमळ फुलवायचं आहे. एपिल, मे महिन्यात महापलिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि बूथ अध्यक्ष निवड लवकर करा. एक कोटी ५१ लाख सदस्य असा संकल्प करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवातून शिकलो आहे'.

bjp Politics
Chandrashekhar Bawankule : प्रत्येक गावात एक दिवस जिल्हाधिकारी, दोन दिवस तहसीलदार येणार | Video

'अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आपले २१ उमेदवार दिले होते. त्यामधील 11 निवडून आलेत, ते महायुतीचे उमेदवार होते. आपण योजनाचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना देणार आहे. एक लाखांपेक्षा जास्त विशेष कार्यकारी अधिकारी नेमायचे आहेत. राज्यात १ कोटी ५१ लाख सदस्य जोडणीच अभियान सुरू केला आहे. आज पुण्यात कार्यशाळा पार पडली. आज १२ हजार पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली', असे बावनकुळे यांनी सांगितले.

bjp Politics
Bawankule Vs Thackeray: उद्धव ठाकरेंची औकात नाही; मोदींवरील टीकेवरून बावनकुळे भडकले

'देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सदस्य नोंदणी पूर्ण करणार आहे. आज १ कोटी १६ लाख सदस्य आहेत. भाजप एकमेव पक्ष आहे. राज्यात पुन्हा एकदा घर चलो अभियान राबवण्यात येणार आहे. भाजपचे 36 कार्यकर्ते घरोघरी जाणार आहेत. 3 लाख कार्यकर्त्यांना सक्रिय मेंबरशिप देणार आहे. सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण विषय आहे. कोर्टाने जे काही मागितलं होतं, ते सगळं दिलं आहे. निवडणूक आयोगाला कोर्ट लवकरच योग्य सूचना देईल, असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

bjp Politics
Mumbai BJP : मंत्र्यांवर 'पक्ष सचिवां'ची करडी नजर, मंत्र्यांचे पीए पक्ष-सरकारमधील दुवा?

'आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात सगळी तयारी करत आहोत. १३ हजार सीट्सवर निवडणूक व्हाव्यात ही आमची इच्छा आहे. संपूर्ण पालिका निवडणुका एकत्रित लढणार आहे. महायुती सर्व नगरपालिका, महानगरपालिका पंचायत समिती जिंकेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com