
मुंबई : मुंबई महापालिकेबाबत तुमचा काय प्लॅन आहे? असा प्रश्न केला असता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, खोदकामाचं ऑडिट होणं गरजेचं आहे. पैसा नेमका जातो कुठं, त्याबाबत पाहायला हवं. बेस्टची परिस्थिती अतिशय खराब आहे. त्याला हजार कोटी दिले आहेत. पण अनेक प्रश्न सुटणार नाहीत. बसेस नवीन कशा घेणार. पगार कसा काढणार? यासारखे प्रश्न आहेत. ईव्ही, डबल डेकर बसेसची मुंबईत गरज आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते 'कॉफी विथ सकाळ'च्या शोमध्ये बोलत होते.
मुंबईत दररोज पाणीसाठा कमी पडतोय. शाळेतील शिक्षण सुधारणा, प्रत्येक शाळेत कॅन्टिन असणं गरजेचं आहे. मुलांमध्ये विविध गोष्टींची आवड निर्माण व्हायला हवी. रूग्णालयाची अवस्था खराब झाली, ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार. आजोबांच्या नावाने रूग्णालय सुरू केले. पण औषधे नाहीत. सोयी सुविधा नाहीत. मागील दोन वर्षांत मुंबईची परिस्थिती अतिशय खराब झाली आहे, अशा बऱ्याच प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांनी मांडले आहेत.
महाराष्ट्राचा आवाज रोखणार नाही
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? दरम्यान याबाबत राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. तुम्ही कितीही आम्हाला पाडायचा किंवा फोडायचा प्रयत्न तयार करा, पण आम्ही महाराष्ट्रासाठी लढणार आहोत. कितीही वार केला तरी आमचा महाराष्ट्राचा आवाज रोखणार नाही. पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या हिताचे बोलत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यासोबत जाणार नाही. कधीकधी त्यांच्याकडून पुढाकार घेतला जातो. मात्र त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार नाही. जो देश, संविधान, जपेल आणि भूमिकेत सातत्य दाखवेल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, मुळात मराठी-गुजराती असा वादच नाही. भाजपमुळे महाराष्ट्र-गुजरात असा वाद सुरू झालाय. मुंबईमध्ये सर्व लोक स्वप्न घेऊन येत असतात. सर्वांची स्वप्न चिरडून तुम्ही काय प्राप्त करतात. राज्यातील उद्योग परराज्यात जातात. नोकऱ्या किती उपलब्ध होतील, हे महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.