Mahayuti
MahayutiSaam Tv News

Mahayuti News: ''स्वबळावर लढायची आमचीही तयारी'', शिंदे सेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; महायुतीत फुट पडणार?

Maharashtra politics latest updates: भाजपच्या विविध बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात येत आहे. यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Published on

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला असतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केली असल्याचं समजतंय. भाजपच्या विविध बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात येत आहे. यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अशातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलं आहे. आम्ही स्वत: स्वबळावर लढायला तयार आहोत, असं शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट म्हणाले, काही नेते उगाच आपलं मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला काय सांगायचं आहे, ते आपल्या नेत्यांना सांगा. आमची महायुती म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर, आम्हाला मान्य असेल, असं शिरसाट म्हणाले.

Mahayuti
Inter-caste marriage: सैराटसारखा थरार! आंतरजातीय विवाहाला विरोध, प्रिन्स दादाने भाऊजीला संपवलं

आम्ही स्वत: स्वबळावर लढायला तयार

आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नका. महायुतीसोबत लढायचं तर, हो म्हणा, नसेल तर आम्ही स्वत: स्वबळावर लढायला तयार आहोत, असं संजय शिरसाट म्हणाले. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुती एकत्र लढणार की स्वबळाचा नारा देणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Mahayuti
Pune News: लष्करात नोकरी लावण्याचं आमिष, २ तरूणांना तब्बल ५ लाखांना गंडवलं

धस - मुंडे भेटीवर शिरसाटांची प्रतिक्रिया

'धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर नसल्याचं धस म्हणाले. पण धस तिथे का गेले, तिथे त्यांच्यात काय चर्चा झाली. याबाबत कुणालाच काहीच माहिती नाही. हे राजकीय भांडवल नाही. कुणाचा तरी जीव गेला आहे. यासाठी जी काही कारवाई सुरू आहे, त्याला अनुसरून सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. सुरेश धस यांनी देखील स्पष्ट केलं आहे. त्या प्रकरणाचा आणि या भेटीचा काहीही संबंध नाही'. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं शिरसाट म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com