chadrapur News
chadrapur Saam tv

Chandrapur Shocking : पोहायला गेले पुन्हा परतलेच नाही; तलावात बुडून ५ तरुणांचा मृत्यू

Chandrapur Shocking News : चंद्रपुरात तलावात बुडून ५ तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाच पर्यटकांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Published on

संजय तुमराम, साम टीव्ही

बदलापुरातील उल्हास नदीत ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना चंद्रपुरात देखील दुर्दैवी घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तलावात ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेत फक्त एकाचा जीव वाचला आहे. पाच जणांच्या मृत्यूने गावात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात बूडून पाच तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरुण पर्यटक आज शनिवारी तलावात पोहायला गेले होते. तलावात पोहायला गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

चंद्रपुरातील या दुर्देवी घटनेतून एका तरुणाचा जीव वाचला आहे. सर्व तरुण हे चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवासी आहेत. तलावात बुडून मृत्यू झालेल्या मृत तरुणांची नावे देखील समोर आले आहेत.

chadrapur News
Crime News : सणाला गालबोट! दोन गटात जोरदार राडा; वाद सोडवायला गेलेल्या पोलिसाची हत्या
chadrapur News
Kalyan Crime : आठ वर्षांचा मुलगा, मारहाण केली, नंतर लादीवर बसवलं; शिक्षिकेचा निर्दयीपणा

नेमकं काय घडलं?

चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे तरुण पर्यटनासाठी घोडाझरी तलावाजवळ गेले होते. तरुण तलावात पोहायला गेले. तलावात पोहायला गेल्यानंतर पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पर्यटकांपैकी ५ जणांचा बुडून मृत्यू झाला. जनक गावंडे, यश गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे अशी मृत तरुणांची नावे आहेत. त्यांच्यातील एक जण वाचला आहे. पाच जणांच्या मृत्यूने साठगाव कोलारी परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. ५ तरुणांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. तसेच या घटनेने साठगाव कोलारी परिसरात शोककळा पसरली आहे.

chadrapur News
Nagpur Accident : होळीची भेट शेवटची ठरली; भीषण अपघातात भावाचा जागीच मृत्यू, तर बहीण गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com