Chandrapur News : अप्रमाणित कृषी निविष्ठेबाबतचा खटला त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करा : मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar : अप्रमाणित कृषी निविष्ठेबाबतचा खटला त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करा : मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwarsaam tv
Published On

Sudhir Mungantiwar : अप्रमाणित कृषी निविष्ठा (बी – बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके) आढळल्यास संबंधित कंपनी व विक्रेत्या विरुद्ध खटले दाखल करण्यात येतात. सदर खटले निकाली काढण्यासाठी ५ ते १० वर्ष लागत असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास विलंब होतो.

त्यामुळे हे खटले त्वरित निकाली काढण्यासाठी शीघ्र कृषी न्यायालय (Fast Track Court) स्थापन करण्याची मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Sudhir Mungantiwar
Kerala Boat Accident: केरळमध्ये मोठी दुर्घटना; बोट उलटून 16 पर्यटकांना जलसमाधी, बचावकार्य सुरू

राज्यात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात मूलभूत कृषी निविष्ठांची शेतकऱ्यांना आवश्यकता असते. विविध बी – बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके उत्पादक व विपणन कंपनीच्या माध्यमातून परवानाधारक कृषी केंद्रामधून कृषी निविष्ठांची विक्री होत असते. (Latest Marathi News)

कृषी निविष्ठा बियाणे कायदा १९६६ व अनुषंगिक कायदे व नियम, रासायनिक खत कायदा १९८५ व कीटकनाशक कायदा १९६८ या अंतर्गत सनियंत्रित केल्या जातात. राज्यातील गुणनियंत्रक निरीक्षकांच्या वतीने बी – बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांचे नमुने परवाना विक्री केंद्रातून तसेच उत्पादक कंपनीच्या फॅक्टरी युनिट मधून घेण्यात येतात.

राज्यातील तपासणी प्रयोगशाळेत सादर केल्यानंतर नमुने अप्रमाणित आढळल्यास वरील कायद्यान्वये संबंधित कंपनी व विक्रेत्याविरुद्ध न्यायालयीन खटला त्या क्षेत्रातील न्यायालयात दाखल करण्यात येतो.

Sudhir Mungantiwar
BSF Soldier Accident : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनाचा भीषण अपघात, १ जवान शहीद, ६ जखमी

सदर खटल्याचा निकाल येण्यास ५ ते १० वर्षे लागत असल्याने शेतकऱ्यांना विहित मुदतीत न्याय मिळत नाही. याकरिता सदर न्यायालयीन प्रकरणांसाठी शीघ्र कृषी न्यायालय (Fast Track Court) स्थापन केले तर शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा प्राप्त होईल. त्यामुळे अशा प्रकरणां साथी राज्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करावे, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com