Chandrapur News : ऐन सण -सोहळे यांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात कचरा कोंडी बघायला मिळत आहे. गेले 4 दिवस चंद्रपूर शहर मनपाचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. कचरा संकलन करणारे कर्मचारी व चालक संपावर गेल्याने शहरातील कचरा संकलन ठप्प झाले आहे. (Maharashtra News)
चंद्रपूर शहरात 15 -16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुवप्रर्तन महोत्सव आहे. यानिमित्त शहरात येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांसाठी स्वच्छता महत्वाची समस्या ठरणार आहे. किमान वेतन आणि मागील कंत्राटदाराची थकीत देणी या विषयावर कंत्राटी सफाई कर्मचारी संपावर गेले आहेत.
गेले कित्येक महिने हे कर्मचारी आपल्या मागण्यासंदर्भात मनपा प्रशासनासोबत पाठपुरावा करत होते. यात कुठलाही तोडगा निघाला नाही. आज संपकरी कर्मचाऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी मनपाने नियुक्त केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना आंदोलकांनी काम करण्यापासून रोखले.
यामुळे स्थानिक पटेल हायस्कूल समोरील चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेकडे चंद्रपूर शहरातील विविध भागात तुंबलेला कचरा प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.