राज्यात बोगस डिग्री रॅकेटचा पर्दाफाश, 5 लाखांत कोणत्याही विद्यापीठाची डिग्री

No Exams, Just Cash: राज्यात शिक्षणव्यवस्थेतील बदलांसाठी आंदोलनं केली जाताहेत. मात्र, शिक्षण क्षेत्राला हादरवणारे धक्कादायक प्रकार काही थांबत नाहीयेत. आता तर कुठलीही परीक्षा न देता अनेकजण पदवीधर झाल्याचं समोर आलंय. हा धक्कादायक प्रकार कुठे घडलाय?... तो कसा उघडकीस आलाय?..
Chandrapur Fake Degree Racket Busted; Degrees Sold Without Exams
Chandrapur Fake Degree Racket Busted; Degrees Sold Without Examssaam tv
Published On

राज्यात पेपरफुटी सत्र कमी होतं की काय़ आता बनावट डिग्रीचं रॅकेट समोर आलंय़. चंद्रपूरात शिक्षण क्षेत्राला हादरवणारा नवा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. राज्यातल्या कोणत्याही विद्यापीठाची डिग्री हवी असेल तर पाच लाख द्या आणि बिनधास्त डिग्री घ्या...अशी भन्नाट ऑफऱ देणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणातील मुख्य आरोपी परिमल बाबूराव गौरकर फरार आहे. मात्र, कागदपत्रांसाठी गिऱ्हाईक शोधणारा वैभव सोनुलेला पोलिसांनी अटक केलीये. दरम्यान, कुठलीही परीक्षा न देता पदवी मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश नेमका कसा झालाय?... ते पाहूयात...

18 जानेवारीला मुख्य आरोपी परिमल गौरकरने शेजारी राहणारे वैभव माशीरकरांना फोन केला. माझ्या गाडीची चावी वडिलांकडून घे आणि गाडीतील एक कापडी थैली तुझ्या घरी सुरक्षित काढून ठेव, असं परिमलनं फोनवर सांगितलं. संशय आल्यानं वैभवनं त्याला कागदपत्रांबद्दल विचारणा केली. त्यावर परिमलनं 'ज्यांना नोकरी, अॅडमिशन किंवा प्रमोशन हवे असेल त्यांना 5 ते 10 लाख रुपये घेऊन पदवी, डिप्लोमा आणि टीसी तयार करून देतो असं सांगितलं. त्यानंतर वैभवला थैलीमध्ये देशातील आणि राज्यातील प्रमुख विद्यापीठांची बनावट गुणपत्रक आणि प्रमाणपत्रे आढळली. मात्र, गेल्या 7 महिन्यांपासून आरोपी परिमल थैली परत नेण्यासाठी आलाच नाही. त्यामुळे पोलिसांच्या भीतीनं अखेर वैभवनं पोलिसांना माहिती दिली आणि रॅकेटचा पर्दाफाश झाला.

या प्रकरणात आरोपींची एकूण मोडस ऑपरेंडी आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस तपासात धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

परिमलकडून कुणी कुणी डिग्री विकत घेतली आणि त्याचा गैरवापर केला आहे याचा तपास करणं गरजेचं आहे. आधीच राज्यात पेपरफुटीचं सत्र सुरू असताना आता बनावट डिग्रीचं रॅकेट समोर आल्यानं शिक्षण क्षेत्राला पारा बोजवारा झाल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com