
चंद्रपूरात एका घरात ११९ मतदारांची नोंद आढळली.
साम टीव्हीने तपास करत एका महिला मतदाराशी संवाद साधला.
प्रकरण उघड झाल्यानंतर तिच्या घराचा क्रमांक बदलण्यात आला.
महाराष्ट्रात बनावट मतदार नोंदींचं प्रमाण चिंताजनक असल्याचं स्पष्ट झालं.
संजय तुमराम, साम प्रतिनिधी
खासदार राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप कागदपत्रे आणि आकडेवारीच्या पुराव्यानिशी केल्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांना उत्तर दिलं. त्यात, असा काही प्रकार आढळला असेल तर, पुराव्यांनिशी आणि शपथपत्रासह आमच्याशी संपर्क साधा, असं आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. त्याचवेळी चंद्रपुरात एकाच घरात ११९ मतदारांची नोंद असल्याचा प्रकार उघडकीस आला.
या मतदारांचा साम टीव्ही शोध घेतला असता एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकाच घरात ११९ मतदारांमधील एक महिला मतदारांशी साम टीव्हीच्या पत्रकारांनी संवाद साधला. त्यानंतर त्या मतदार महिलेच्या घराचा क्रमांक बदलण्यात आलाय. दरम्यान विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतांची चोरी होत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केला होता.
त्यानंतर देशभरातून बनावट मतदारांचे प्रकार उघकीस येत आहेत. महाराष्ट्रात सुद्धा बनावट मतदारांची नोंदणी झालीय. एकाच पत्त्यावर अनेकांची नावे, एका कोणी दुसऱ्यांची नावे, जिंवत व्यक्तींना मृत दाखवणं, तर मृत व्यक्तींना जिंवत दाखवणं असे प्रकार मतदार याद्यांमध्ये दिसून येत आहेत.
चंद्रपुरातही एकाच घराच्या पत्त्त्यावर तब्बल ११९ मतदारांची नोंदणी झाल्याची बाब समोर आली आहे. घुग्गुस येथे ११९ मतदारांचा पत्ता एकाच घरी दाखवण्यात आला होता. या मतदारांचा शोध साम टीव्हीने घेतला असता या मतदारांमधील एक महिला मतदार कॅमेऱ्यासमोर आलीय. सत्यवती डाकूर असं या महिलेचं नाव आहे. त्या घुग्गुस येथील लुंबिनीनगर येथे त्या वास्तव्यास आहेत.
मागील पंधरा वर्षांपासून त्या इथेच स्वतःच्या घरात राहत आहेत. त्यांचे पती, मुलगा, सून असा त्यांचा परिवार आहे. एकूण सहा मतदार असलेल्या या घरात केवळ सत्यवती डाकूर यांचाच पत्ता बदललाय. मतदार यादीत त्यांच्या घराचा क्रमांक 350 दाखवण्यात आला आहे. मात्र हे कसे घडले, याची त्यांना काहीही कल्पना नाही, असं त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले. सत्यवती डाकूर यांनी जेव्हा पत्ता का बदलला याची विचारणा निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना केली. तेव्हा त्यांनी तुमचं मतदान आता दुसरीकडे गेलं असं सांगितलं. पण घराचा पत्ता कसा बदलला हे आम्हाला माहिती नाही,असं त्या म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.