
Summary -
पैठण तालुक्यात २३,१२२ मतदारांची नावे दोन ठिकाणी नोंदवली गेली.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दुहेरी मतदानाचा संशय.
भाऊसाहेब पिसे यांनी तक्रार करून सविस्तर यादी सादर केली.
निवडणूक विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही मतदार यादीतला मोठा घोळ समोर आला आहे. पैठण तालुक्यात ३ लाख २ हजार २३१ मतदारांपैकी २३ हजार १२२ जणांची नावे दोन ठिकाणी असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मतदार यादीत गंभीर घोळ प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर आता सुनावणी घेऊन एक ठिकाणचे नाव वगळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये हेच मतदार दोन ठिकाणी मतदान केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेली यादी तपासल्यानंतर २५ हजार ८२० मतदारांची नावे दुहेरी नोंदवली गेल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. यामध्ये पैठणमधील २ हजार ६९८ आणि पैठण तालुक्यातील २३ हजार १२२ मतदारांचा समावेश आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पैठण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे यांनी याबाबत ३१ जुलैला निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यात मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक, दोन्ही ठिकाणचे यूपीआय क्रमांक व गावांची नावे नमूद करत सविस्तर यादी निवेदनासोबत सादर करण्यात आले होते त्यातून हे निष्पन्न झाले आहे.
तर पैठण नगर परिषद हद्दीत सध्या ३५ हजार ७२२ मतदार आहेत. त्यापैकी २ हजार ६९८ जणांची नावे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या यादीतही नोंदवली गेली आहेत. यामध्ये ढोरकीन, मुधलवाडी, केकत जळगाव, दाभरुळ, विहामांडवा, बिडकीन, गेवराई बाशी, चितेगाव, सोलनापूर, आखतवाडा, पुसेगाव, वाघुंडी, तेलवाडी आदी गावांचा समावेश आहे. तालुकास्तरावरही एकाच मतदाराची नावे दोन ठिकाणी असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस आले आहेत. पैठण तालुक्यातील एकूण ३ लाख २ हजार २३१ मतदारांपैकी २३ हजार १२२ जणांची नावे दुहेरी आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.