
त्रिशूरमधील एका पत्त्यावर ९ बनावट मतदारांची नोंदणी उघडकीस
पत्ता गैरवापर करून मतदार याद्यांमध्ये नावं समाविष्ट केल्याचा आरोप
महाराष्ट्र, कर्नाटकानंतर केरळातही मतदार घोटाळ्याचे वृत्त
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह
लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापलंय. कर्नाटक आणि महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. दरम्यान मतदार याद्यामधील मतदारांचा घोळ महाराष्ट्र आणि कर्नाटकातच नाही तर केरळमध्येही २०२४ निवडणुकीत मतदार याद्याचा घोळ झाल्याचं उघडकीस आले आहे.
केरळमधील एका महिलेने असा दावा केला आहे की, राज्यातील त्रिशूर येथील तिच्या निवासी पत्त्यावर ९ बनावट मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. एका महिलेने आरोप केला की तिच्या नकळत तिच्या पत्त्याचा वापर करून नऊ बनावट मते जोडण्यात आली आहेत. या आरोपानंतर निवडणूक आयोगाचा कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या कुटुंबातील ती एकमेव व्यक्ती आहे जी त्रिशूर शहरात मतदान करते.तर या महिलेच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांच्या मूळ गावी पूचीनिपाडम येथे मतदार म्हणून नोंदणी केलीय असा दावा तिने केलाय.२०२४ च्या निवडणुकीत भाजपने येथील जागा जिंकली होती. दरम्यान भाजप चोरीच्या मतांनी निवडणुका जिंकत असते, असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय.
त्यांच्या आरोपानंतर इंडिया आघाडी विरुद्ध निवडणूक आयोग असा संघर्ष सुरू झालाय. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील निवडणुकांवेळी मतांची चोरी झाल्याचा आरोप करण्यात येत असताना आता केरळमध्येही मतदार याद्यांचा घोळ झाल्याचं उघडकीस आले आहे. केरळमधील आरोप त परिसरातून आले आहेत. त्रिशूर शहरातील पूनकुन्नम कॅपिटल व्हिलेज अपार्टमेंट्समधील ४सी येथे प्रसन्ना यांचे घर आहे.
प्रसन्ना यांच्यामते त्याच एकट्या आहेत ज्या त्रिशूर येथील मतदारसंघातून मतदान करतात. त्यांच्या घरातील इतर कुटुंबात ४ वयस्कर आणि दोन मुले आहेत. त्यांनी त्यांचे गाव पूचीनिपाडम मध्ये मतदार नोंदणी केलीय. प्रसन्ना राहत असलेल्या ठिकाणी मतदारांची पडताळणी करण्यासाठी काही कर्मचारी आले होते. त्यांनी त्यांचे नाव सोडून इतर ९ जणांच्या नावाची विचारणा केली. त्यावेळी प्रसन्ना यांना आपल्या घराच्या पत्त्यावर ९ जणांच्या नावांची बनावट नोंदणी झाल्याचं समजलं.
मतदारांची पडताळणी करणाऱ्या व्यक्तीने जे नावे घेतली आहेत, त्यापैकी कोणत्याच व्यक्तीला आम्ही ओळखत नसल्याचं त्या महिलेनं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. पण असं कोणाची संमती न घेता कोणाच्या पत्त्यावर कोणत्याही व्यक्तीचं नाव नोंदवणे हे चुकीचे असल्याचं त्या म्हणाल्या. दरम्यान प्रसन्ना यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केलीय. दरम्यान या प्रकारानंतर केरळमधील राजकीय वर्तुळात वातावरण तापलंय. आयोगाचा हा घोळ लक्षात येताच सीपीएमनं भाजपवर हल्लाबोल केलाय.
वॉटर लिली आणि कॅपिटल व्हिलेज सारख्या इतर पूनकुन्नम फ्लॅटमध्येही अशाच मतदार यादीतील अनियमितता आढळून आलीय. रिकाम्या फ्लॅटचा वापर इतर जिल्ह्यांमधून मते हस्तांतरित करण्यासाठी बनावट पत्ते म्हणून केला जातोय असा आरोप सीपीएम कार्यकर्त्यांनी केलाय. विशेष म्हणजे हा घोळ खऱ्या फ्लॅट मालकांना माहितीच नाही, असंही सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय.
दरम्यान या आरोपांमुळे सीपीएम नेते आणि त्रिशूरचे माजी उमेदवार व्हीएस सुनील कुमार यांच्या दाव्यांना बळकटी मिळालीय. निवडणूक आयोगावर मतदार नोंदणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. दरम्यान त्रिशूरमध्ये भाजपने २०२४च्या लोकसभेत विजय मिळवला होता. येथे भाजपचे उमेदवार सुरेश गोपी यांचा विजय झाला होता. या मतदार संघात सुनील कुमार आणि के मुरलीधरन यांच्याशी सुरेश गोपी यांची लढत झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.