काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळली, विजय वडेट्टीवार 'डाव' उलटवण्याच्या तयारीत; राजकारणात खळबळ

Political Twist in Chandrapur Congress: चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळली. विजय वडेट्टीवार गटाकडून गटनेते सुरेंद्र अडबाले यांना हटवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा असून धानोरकर गटातील तीन नगरसेवक वडेट्टीवार गटात गेल्याचे समजते.
Vijay Wadettiwar camp plans to remove Surendra Adbale as Congress group leader
Vijay Wadettiwar camp plans to remove Surendra Adbale as Congress group leadersaam tv
Published On

संजय तुमराम, साम टीव्ही

चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नवे गटनेते सुरेंद्र अडबाले यांना हटवण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार गटाने हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर गटातील तीन नगरसेवक वडेट्टीवार यांच्या गोटात दाखल झाल्याचे समजते. बुधवारी रात्रीच त्यांना चंद्रपूरबाहेर हलविण्यात आल्याची चर्चा असून, आता धानोरकर गटाकडे १३, तर वडेट्टीवार गटाकडे १४ नगरसेवकांचे संख्याबळ झाल्याचे समजते. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस २७ नगरसेवकांसह सर्वांत मोठा पक्ष आहे. मात्र, नेत्यांतील अंतर्गत कलहाचा लाभ भाजपने उचलला आणि सत्ता स्थापन केली.

Vijay Wadettiwar camp plans to remove Surendra Adbale as Congress group leader
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उलटफेर होणार; मुंबई शहर अध्यक्षपदी 'या' नेत्याची लागणार वर्णी, चर्चांना उधाण

तत्पूर्वी खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार या दोन्ही गटांच्या नगरसेवकांनी एकत्र येत राजेश अडूर यांची गटनेतेपदी निवड केली होती. मात्र, स्थायी समितीत खासदार धानोरकर यांच्या गटातील नगरसेवकांची नावे अडूर यांनी दिली नाहीत. तेव्हापासून अडूर यांना पदावरून हटविण्याच्या हालचाली पक्षातील विरोधी गटाकडून सुरू झाल्या. अखेर बहुमताचा आकडा गाठण्यात आला आणि १६ नगरसेवकांच्या पाठिंब्याने सुरेंद्र अडवाले यांची गटनेतेपदी निवड झाली.

Vijay Wadettiwar camp plans to remove Surendra Adbale as Congress group leader
Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

आडबाले हे धानोरकर गटाचे आहेत. गटनेता बदलण्याचे हे नाट्य जवळपास दीड महिना चालले. हे प्रकरण न्यायालयातही गेले. भाजपमधील अंतर्गत वादामुळे पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर गटनेता बदलून आपल्या गटातील व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून पाठविण्यासाठी आमदार वडेट्टीवार गटाने प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

Vijay Wadettiwar camp plans to remove Surendra Adbale as Congress group leader
NCP Reshuffle: सुनेत्रा पवारांनी भाकरी फिरवली; निर्मला नवले यांच्यावर राष्ट्रवादी पक्षानं दिली मोठी जबाबदारी

अडबाले यांना गटनेतेपदी विराजमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे काँग्रेसचे नगरसेवक महानंदा वाळके, विनोद लभाने आणि आकाश मानकर यांनी आता खासदार प्रतिभा धानोरकर गटाला जय महाराष्ट्र केल्याचे समजते. मात्र, त्यांच्या भूमिकेतील अचानक झालेल्या बदलाचा 'अर्थ' अद्याप अनेकांना लागलेला नाही. त्यांना बुधवारी रात्री चंद्रपूर शहराबाहेर हलविण्यात आल्याचेही समजते. गटनेता बदलण्यासाठी साधे बहुमत गृहीत धरल्यास १४ नगरसेवकांची आवश्यकता आहे. हा आकडा गाठण्यासाठी आवश्यक जुळवाजुळव वडेट्टीवार गटाने केल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत गटनेता बदलाच्या राजकीय नाट्याच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com