Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उलटफेर होणार; मुंबई शहर अध्यक्षपदी 'या' नेत्याची लागणार वर्णी, चर्चांना उधाण

NCP Reshuffle : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई शहर अध्यक्षपदासाठी झिशान सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पक्षाच्या संघटनात्मक फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे.
NCP Reshuffle :
NCP MUMBAI RESHUFFLE: ZEESHAN SIDDIQUE LIKELY TO BECOME MUMBAI CITY CHIEFsaam tv
Published On
Summary
  • अजित पवार गटात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता

  • मुंबई शहर अध्यक्षपदासाठी झिशान सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा

  • पार्थ पवार पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत लक्ष घालत असल्याचीही चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात नेतृत्वाची सूत्रे सुनेत्रा पवारांकडे गेल्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मुंबई अध्यक्षपदावर झिशान सिद्दीकी यांची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगत आहे.

NCP Reshuffle :
पद्मश्री प्रतापराव पवारांच्या योगदानाचा गौरव; १५ ऑगस्टला होणार कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचं उद्धघाटन

अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत पार्थ पवार लक्ष घालत असल्याने सिद्दीकी यांना मुंबई शहर प्रमुखाची जबाबदारी मिळू शकते, अशी दाट शक्यता आहे. पार्थ पवार यांचा पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत वाढता सहभागही चर्चेचा विषय ठरू लागलाय.

झिशान सिद्दीकी कोण आहेत?

झिशान सिद्दीकी हे दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. त्यांनी २०१९ मध्ये वांद्रे पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकली होती. २०२४ मध्ये त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत.

मे २०२६ पासून त्यांचा विधान परिषद कार्यकाळ सुरू झालाय. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती. मात्र पक्षाने झिशान सिद्दीकी यांना संधी दिली. त्यानंतर आता थेट मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

NCP Reshuffle :
Supriya Sule: काल, आज आणि उद्या शिवसेना उद्धव ठाकरेंचीच अन् राष्ट्रवादी शरद पवारांचीच, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार

अजित पवार गटाचे ठाणे शहर युवक अध्यक्ष विरू वाघमारे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शरद पवार गटात प्रवेश केलाय. वाघमारे यांच्यासह हेमंत वाणी यांनीही अजित पवार गटाला रामराम ठोकलाय. ठाणे शहरातील राष्ट्रवादी (अजित पवार)चे नेतृत्व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान देत नसल्याचा आरोप करीत युवक अध्यक्ष विरू वाघमारे, सरचिटणीस हेमंत वाणी यांनी बुधवारी सायंकाळी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com