पद्मश्री प्रतापराव पवारांच्या योगदानाचा गौरव; १५ ऑगस्टला होणार कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचं उद्धघाटन

Skill and Entrepreneurship Centre Inauguration: विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या पाच दशकांच्या योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे. त्यांचा गौरव म्हणून कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टला उद्घाटन होणार आहे.
PRATAPRAO PAWAR HONOURED
PRATAPRAO PAWAR HONOUREDsaam tv
Published On

विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या गेल्या अर्धशतकाच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा गौरव म्हणून संस्थेने पद्मश्री प्रतापराव पवार कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र सुरू करण्याचे ठरवले आहे. पद्विभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते १५ ऑगस्टला या केंद्राचे उदघाटन होत आहे त्यानिमित्त प्रतापरावांच्या योगदानाचा धावता आढावा.

प्रतापरावांकडे समितीच्या कार्याची धुरा वयाच्या साधारण ३२ मध्ये आली. संस्थापक डॉ. अच्युतराव आपटे यांनी त्यांना विश्वस्त म्हणून जबाबदारी घेण्यास सांगितले. करिअरचा विचार आणि सामाजिक काम असे मनात द्वंद असताना एक ध्येयवादी संस्थापक ही जबाबदारी घेण्यास सांगतो म्हटल्यावर त्यांना ती निमूटपणे स्वीकारली. त्यांच्या स्वभावाप्रमाणे जबाबदारी घेतली म्हणजे त्यात खोलवर जायचे. त्यांनी संस्थेच्या ध्येय, उद्दिष्टापासून सर्व गोष्टी समजून घेतल्या.

संस्थेसमोरची आव्हाने, विद्यार्थ्यांचे प्रश्न, अडचणी लक्षात घेत त्यावर मार्ग काढायला सुरुवात केली. अनुभवातून संस्थेत काही उपक्रम सुरू केले. १९८१ मध्ये त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आली ती आजतागायत आहे. अनेक संस्थांमधून पदासाठी जी रस्सीखेच होते त्याला समिती अपवाद आहे. इथे प्रत्येकजण पदाचा विचार न करता कामातील आनंद महत्त्वाचा मानतो म्हणून संस्थेविषयी समाजाच्या आणि साहाय्यदात्यांच्या मनात एक वेगळा आदर आहे.

PRATAPRAO PAWAR HONOURED
Vinayak Mete Death Case: विनायक मेटेंच्या मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट; ज्योती मेटे यांचा संशय कोणावर?

समितीतील विद्यार्थ्यांनी काही अर्थार्जन करावे म्हणून कमवा व शिका योजना सुरू करण्यात आली. त्यावेळी प्रतापरावांनी सकाळमधील एक पेपर कटिंग मशीन समितीत आणून विद्यार्थ्यांना पेपर कटिंगचे काम दिले. त्यातून शेकडो विदयार्थ्यांना अर्थाजर्नाची संधी मिळाली. केवळ योजना मांडण्यापेक्षा ती अमलात आणण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. वेळेबाबत अतिशय काटेकोर, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार, सर्व कायदेशीर बाबींची वेळेत पूर्तता या त्यांच्या आग्रहामुळे संस्थेच्या कार्यपद्धतीला एक शिस्त आहे, पारदर्शकता आहे.

समितीचा विद्यार्थी म्हणून त्यांचा आम्हा आजी व माजी विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. समितीत यांची अशी जडणघडण होते की, ते चुकीचे काही करणार नाहीत, असा विश्वास ते जाहीरपणे व्यक्त करतात. अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे समितीच्या कामाशी जोडलेले आहेत आणि संस्थेची मूल्ये अधिक बळकट करत संस्था पुढे जात आहे याचाही त्यांना अभिमान आहे.

काही विद्यार्थी वेगळे काही करू पाहत असतील तर त्या त्या क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या ते भेटी घडवून आणतात. या नव्या पिढीचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांना वेळ देणे या छोट्या गोष्टींतूनही त्यांचे मोठेपण लक्षात येते. अगदी मीटिंग रुममधून बाहेर पडताना लाईट बंद करण्याची त्यांची कृती नकळत या विद्यार्थ्यांना एक संस्कार असतो. कामानिमित्त त्यांना फोन केला आणि काही कारणाने लागला नाही, तर त्यांचा परत फोन येतो, ही त्यांची दक्षता खूप काही शिकवण देणारी आहे.

PRATAPRAO PAWAR HONOURED
School Homework:विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास देण्यावर बंदी; रत्नागिरीतील सर्व शासकीय आणि खासगी शाळांसाठी नियम लागू

मी विश्वस्त असल्यापासून अनुभवतो आहे की आजवर एकाही मीटिंगला त्यांना कधी उशीर झालेला नाही. यातून आमचेही वेगळे शिक्षण होते. माझ्या मुलाला एका स्पर्धेत चांगले यश मिळाले. हे त्यांना समजल्यावर त्याच्या सर्व गटाला घरी बोलावून त्यांनी अभिनंदन केले आणि कौही मौलिक मार्गदर्शनही. असे ते आता माजी विद्यार्थ्यांच्या पुढील पिढीशीही जोडलेले आहेत. हे आम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत.

उद्योजकतता हा सरांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने समितीत केवळ नोकरीयोग्य विद्यार्थी घडविण्यापेक्षा उद्योजक घडवावेत म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. भरीव आर्थिक योगदान दिले. त्यावर गेली चार वर्षे काम सुरू आहे. त्याचे परिणामही उत्तम दिसू लागले आहेत. शेतीत एआय तंत्रज्ञानाचा भारतातील पहिला प्रयोग त्यांनी बारामतीत सुरू केला. त्याचे फायदे लक्षात घेऊन समितीच्या पुण्यातील जागेत ही तंत्रज्ञानाधारित शेती प्रयोगशाळा त्यांच्या पुढाकारातून सुरू झाली.

समितीतील विदयार्थी शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने येथे प्रत्यक्ष ज्ञान घेतल्यावर आपल्या गावी ते हे प्रयोग करू शकतात. त्यातील नफा लक्षात आल्यावर कृषी उद्योजकतेच्या संधी कशा निर्माण होतील हा त्यांचा यामागे विचार आहे. तसेच कालानुरुप विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान शिक्षणाच्या संधी मिळाव्यात म्हणून समितीत रोबिटिक्स, एआय लॅब अशी अत्याधुनिक व्यवस्था उभी राहिली आहे. मी विद्यार्थी असताना सरांचे उद्योजकतेचे विचार ऐकून उद्योजक होण्याचे स्वप्न पाहिले. १९९१ मध्ये बी.एसस्सीची पदवी घेतली. दरम्यान संगणकाचे शिक्षणही घेतले. त्यातील संधी लक्षात आल्याने त्यावेळी इंदापूरला संगणक प्रशिक्षण संस्था सुरू केली. आजवर ४० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना त्यातून प्रशिक्षण देऊ शकलो.

समितीचे काम केवळ साहाय्यदात्यांच्या मदतीवर सुरू आहे. त्यामुळे संस्था म्हणून प्रत्येक रुपयाचा योग्य खर्च होण्याची आपली जबाबदारी असल्याची जाणीव ते सतत देत असतात. ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणाची मोठ्या प्रमाणात संधी मिळावी म्हणून त्यांच्या पुढाकारातून संस्थेने मुलींसाठी निवास व्यवस्था वाढविण्याचा निर्णय घेतला. समाजाच्या भक्कम पाठिंब्यामुळे दोन वर्षात वसतिगृहाची उभारणी करता आली.

सुमारे ४०० मुलींची व्यवस्था वाढली. आता समितीच्या छत्राखाली ८०० मुली आणि ५०० मुले आहेत. अहिल्यानगरला दोन वसतिगृहांची उभारणी झाली. आता पुढच्या प्रकल्पांचा विचार सुरू आहे. मी`च्या ऐवजी `आपण यातून पुढे जाणारे नेतृत्व काळाच्या कसोटीवर टिकते. तसेच नेतृत्व सरांच्या रुपाने समितीला लाभले हे संस्थेचे भाग्य आणि संस्थापकांची दूरदृष्टी म्हणावी लागेल.

तुषार रंजनकर

कार्यकारी विश्वस्त,माजी विद्यार्थी

विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com