

विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणात चार वर्षांनंतर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी विनायक मेटे यांच्या चालकावर संशय व्यक्त केला आहे.
न्यायालयीन प्रक्रियेला होत असलेल्या विलंबाबाबतही सवाल उपस्थित
दिवंगत लोकनेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणात नवीन ट्विस्ट आलाय. विनायक मेटे यांच्या पत्नीने त्यांच्या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त केला आहे. विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणातील संशय, न्यायालयीन प्रक्रियेला होत असलेला विलंब आणि संबंधित व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
विनायक मेटे यांच्या निधनाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त बीडमधील स्मृतीस्थळावर आज अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी मेटे यांच्या अपघात प्रकरणावरून गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. विनायक मेटे यांच्या अपघातप्रकरणी त्यांच्या चालकावर ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केलाय.
विनायक मेटे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त बोलताना ज्योती मेटे यांनी मेटे यांच्या अपघातातील चालकावर सुरुवातीपासूनच संशय असल्याचं सांगत, संबंधित आरोपी न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान वारंवार गैरहजर राहत असल्याचा आरोपही त्यांनी केला. न्यायालयीन प्रक्रियेचा आम्ही आदर करतो; मात्र आरोपी सतत गैरहजर राहत असल्याने अद्याप चार्ज फ्रेम झालेला नाही, असे त्यांनी म्हटले.
दुसरीकडे चालक हा सामाजिक जीवनात सक्रिय दिसतोय. त्याच्याकडे गाड्या आहेत. तो बैलगाडा शर्यती आयोजित करतो. परंत त्याच्याकडे शर्यती आयोजित करण्यासाठी पैसा कुठून येतो, याचाही गांभीर्याने तपास झाला पाहिजे, अशी मागणी ज्योती मेटे यांनी आज केली. या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मेटे साहेबांच्या निधनानंतर महायुतीच्या सत्तेत शिवसंग्रामला अपेक्षित वाटा मिळाला नाही, याची खंत कार्यकर्त्यांमध्ये असल्याचेही ज्योती मेटे यांनी बोलून दाखवले. दरम्यान, मेटे साहेबांच्या निधनानंतर महायुतीच्या सत्तेत शिवसंग्रामला अपेक्षित वाटा मिळाला नाही, याची खंत कार्यकर्त्यांमध्ये असल्याचेही ज्योती मेटे यांनी बोलून दाखवले.
“आम्ही साहेबांना गमावलं आहे, आमचं पूर्ण भविष्य उद्ध्वस्त झालं आहे. मात्र या प्रकरणाकडे जर कानाडोळा केला जात असेल, तर ही बाब योग्य नाही. या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन आमचं म्हणणं तपशीलवार मांडणार आहोत.”
डॉ. ज्योती विनायक मेटे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.