Hitendra Thakur : बॅग, डायरी आणि १०,००,००० रुपयांची रोकड; हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं नेमकं काय घडलं? वाचा

Hitendra Thakur News : बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी विरारमधील घटनेवर सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी गंभीर आरोप केले.
बॅग, डायरी आणि १०,००,००० रुपयांची रोकड; हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं नेमकं काय घडलं? वाचा
Hitendra ThakurSaam tv
Published On

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही

विरार : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्यादिवशी विरारमध्ये मोठा गोंधळ झालाय. विरारममध्ये येऊन भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याच्या आरोपानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याच प्रकरणावर भाजप नेते विनोद तावडे, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, भाजप उमेदवार राजन नाईक यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी गंभीर आरोप केले.

बॅग, डायरी आणि १०,००,००० रुपयांची रोकड; हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं नेमकं काय घडलं? वाचा
Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं? वोटर आयडी नसल्यास काय करावे? हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

विरारमधील प्रकरणावर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर म्हणाले, 'आताचे खासदार स्वत:च्या वडिलांवर आरोप करतात. हेमंत सावरा खासदार यांच्यावरही आरोप करतात. माझ्यावर जे आरोप करत आहेत. ते सर्व कंत्राटदार आहेत. भाजपच्या काही मित्रांनी सांगितलं की, पैसे वाटप होत आहे. बॅग आणि डायरी दाखवू नका, असे विनोद तावडे सांगत आहेत. आम्ही १० लाख रुपये रोख पकडले. खरंतर क्षितीज ठाकूर आणि राजन नाईक यांच्यात वाद आहेत'.

बॅग, डायरी आणि १०,००,००० रुपयांची रोकड; हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं नेमकं काय घडलं? वाचा
Hitendra Thakur: भाजपच्याच कार्यकर्त्यांनी आम्हाला पैसे वाटपाची माहिती दिली, हितेंद्र ठाकूर यांचा आरोप

बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या पत्रकार परिषदेवेळी एकच गोंधळ पाहायला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. या पत्रकार परिषदेच्या वेळी पैसे आणि डायरीचे व्हिडिओ दाखवण्यात आले. पत्रकार परिषदेवेळी गोंधळ झाल्याने त्यांना परिषद बंद करावी लागली.

बॅग, डायरी आणि १०,००,००० रुपयांची रोकड; हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं नेमकं काय घडलं? वाचा
Virar Accident : विरारमध्ये भीषण अपघात; भरधाव टेम्पोने चिरडल्याने २ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू

दरम्यान, पत्रकार परिषद घेतली म्हणून हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी दिली आहे. हॉटेलमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे दोन दिवसांपासून बंद असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com