Hitendra Thakur: भाजपच्याच कार्यकर्त्यांनी आम्हाला पैसे वाटपाची माहिती दिली, हितेंद्र ठाकूर यांचा आरोप
भाजपचे नेते विनोद तावडे मंगळवारी विरार पूर्वला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. यावेळी ते ५ कोटी रुपये घेऊन आले होते. त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विवांता हॉटेलमध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आली. यावेळी भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. यासंदर्भात हितेंद्र ठाकूर यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली.
हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, 'विनोद तावडेंना आम्ही आणलं का? आमचा बनाव असेल तर आम्ही आणलं का त्यांना? त्यांना साधा नियम माहीत नाही का? विनोद तावडे माझ्या सांगण्यावरून आले का? बनाव कसला आहे. यांना पैशांसकट पकडलंय. डायरी कॅमेऱ्यासमोर धरल्या आहेत.'
'आमच्या कार्यकर्त्यांनी इथली मला माहिती दिली. तर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पैसे वाटपाची माहिती दिली. आम्हाला काय स्वप्न पडलं होतं का की पैसे वाटप केले जातंय. यांचे कार्यकर्ते आहेत. ४८ तास आधी मतदारसंघ सोडावा लागतो. एवढा साधा नियम यांना माहीत नाही का? शिक्षणमंत्री होते हे. विनोद तावडेंचे मला फोन आले होते. इनकमिंग कॉल किती आहेत ते पाहा. विनोद तावडेंनी मला सांगितलं चूक झाली आता जाऊ द्या.'
आम्ही निवडणूक आयोगाने मागणी करणार आहोत. 'यासंदर्भात रितसर कारवाई करावी. नियमाने पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करावी.', अशी मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.