Vinod Tawde Money Distribution : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. मागील चार तासांपासून विनोद तावडेंना विरारमधील विवांता हॉटेलमध्ये घेराव घालण्यात आलाय. बविआचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी तावडे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप केला. विनोद तावडेंनी आरोप फेटाळून लावलाय. पण तिथे काही डायऱ्या सापडल्या असून त्यात काही नोंदी असल्याचाही दावा बविआने केलाय. तावडेंनी २५ वेळा मला फोन केल्याचा दावा केलाय. त्याशिवाय तावडे येथे आल्याची माहिती भाजप नेत्यांनीच दिल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केलाय.
भाजपच्या लोकांनीच सांगितलं की ५ कोटी घेऊन येतात. इकडे पैसे वाटप सुरू आहे. डायऱ्या आहेत. निवडणूक आयोग आणि पोलीस विभागाने योग्य ती कारवाई करावी. आम्ही आल्यावर सीसीटीव्ही चालू केला. आधी बंद होता. या हॉटेलवाल्यावर कारवाई केली पाहिजे. पैसे वाटपामुळं सीसीटीव्ही बंद केले होते, असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला.
विनोद तावडेंना आम्ही आणलं का? आमचा बनाव असेल तर आम्ही आणलं का त्यांना. त्यांना साधा नियम माहीत नाही का.? त्यांना पैशासोबत पकडले.
आमच्याच कार्यकर्त्यांनी मला माहिती दिली. अहो यांच्याच कार्यकर्त्यांनी माहिती दिली. आम्हाला काय स्वप्न पडलं का? काही पैशांचं वाटप केलं. यांचे कार्यकर्ते आहेत. ४८ तास आधी मतदारसंघ सोडावा लागतो. एवढा साधा नियम माहीत नाही का? असे ठाकूर म्हणाले.
विनोद तावडेंचे मला फोन आले. इनकमिंग कॉल किती आहेत ते पाहा. विनोद तावडेंनी सांगितलं चूक झाली आता जाऊ द्या, असा दावाही ठाकूर यांनी केला. तावडेंवर रितसर कारवाई करण्यात यावी, तोपर्यंत विनोद तावडे यांना सोडणार नाही, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.