

Sanjay Raut News: समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. बुलढाण्यात हा अपघात झाला असून अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांंना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. अशात समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग असल्याचा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. (Latest Marathi News)
आज शिवसेना ठाकरे गट आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा निघणार आहे. त्याबाबत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी म्हटलं की, या मोर्चात अडथळे यावे यासाठी अनेक कारणे करण्यात येत आहेत. तरी हा मोर्चा निघत आहे. दुर्दैवाने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे. त्या शापित रस्त्यावर २५ जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. त्यांच्याविषयी आमच्या मनात संवेदना आहेत पण जनतेच्या प्रश्नावरती हा मोर्चा निघणार आहे.
समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अशात या महामार्गावर शुक्रवारी भयंकर अपघात झाला. भ्रष्टाचार करुन हा महामार्ग बांधण्यात आला आहे. त्यामुळे हा शापित महामार्ग आसल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
आज शिवसेनेचा मोर्चा पूर्ण ताकतीने
जेव्हापासून महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आलेली आहे तेव्हापासून नगरसेवकांना लोकप्रतिनिधींना येऊ दिलं जात नाही. संपूर्ण कारभार प्रशासनाच्या माध्यमातून मंत्रालय आणि सध्याच्या वर्षामधून सुरू आहे. महानगरपालिकेवरील या मोर्चाचे नेतृत्व युवा सेना प्रमुख शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे करत आहेत. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत, असंही संजय राऊतांनी (Sanjay Raut) यावेळी ठामपणे सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.