Bullock Cart Race : निलेश चव्हाण, आदेश पाटलांच्या बैलगाडीनं मारलं मैदान

बैलगाडी स्पर्धांचा हा थरार अनुभवण्यासाठी शर्यतप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
bullock cart race
bullock cart racesaam tv
Published On

- राजेश भोस्तेकर

रायगड : महाड पोलादपुर बैलगाडी स्पर्धा पंच कमिटीचे माजी अध्यक्ष (कै.) सुभाष खांबे यांच्या स्मरणार्थ आज (रविवार) महाड (mahad) तालुक्यातील काचले या गावी बैलगाडी स्पर्धांचे (bullock cart race) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये ३६ बैलगाडी मालकांनी सहभग घेतला. (bullock cart race latest marathi news)

या स्पर्धेत निलेश चव्हाण, तेलंगे यांच्या बैलगाडीचा प्रथम क्रमांक, आदेश पाटील, मोहोप्रे यांचा द्वितीय क्रमांक तसेच श्री क्षेत्र स्वयंभू प्रतिष्ठान, वरंधचा तृतीय, महेश जाधव, भावे यांच्या बैलगाडीचा चतुर्थ क्रमांक आला. बैलगाडीच्या या स्पर्धांवर गेली सात वर्ष बंदी होती. ही बंदी उठल्यानंतर आता स्पर्धा सुरु झाल्या आहेत. बैलगाडी स्पर्धांचा हा थरार अनुभवण्यासाठी शर्यतप्रेमींनी (sports) मोठी गर्दी केली होती.

bullock cart race
जंगलातुन चरून आल्यानंतर वरंधातील एकाच शेतक-याच्या १० म्हशींचा झाला मृत्यू

या स्पर्धांना परवानगी देताना ५० हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते. त्याच बरोबर परवानगी जिल्हा पातळीवरून दिली जाते. या जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी आयोजकांनी केली आहे. याबाबत आयोजकांच्यावतीने सचिन ओझर्डे म्हणाले काही जाचक अटींमुळे स्पर्धा आयाेजनात अडचणी येताहेत. राज्य शासनाने (maharashtra government) जाचक अटी दूर करावेत.

Edited By : Siddharth Latkar

bullock cart race
Thane: निलेश- नितेश जाेडगळीवर गुन्हा दाखल करा; ठाण्यातील NCP ची मागणी
bullock cart race
Satara: पाेलिस उपनिरीक्षकाच्या अंगावर घातली Car; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल
bullock cart race
Cristiano Ronaldo Hat-Trick: फुटबॉलमधील जागतिक विक्रम क्रिस्टियानो रोनाल्डोनं मोडला
bullock cart race
BJP: चांद्यापासून बांद्यापर्यंत फडणवीसांना बजावलेल्या नाेटीसीची हाेळी; भाजप आक्रमक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com