Buldhana Crime : अवैध दारू विक्रेत्यांचा पाठलाग, दोघांनी पोलिसांच्या चालत्या बाईकला लाथ मारली, अन्...

Buldhana Police Constable Bhagwat Giri Dies : बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवैध दारु घेऊन जाणाऱ्या दोघांचा पाठलाग करताना पोलीस शिपाई भागवत गिरी यांचा मृत्यू झाला आहे.
Police constable Bhagwat Giri dies while chasing illegal liquor sellers
Police constable Bhagwat Giri dies while chasing illegal liquor sellers Saam Tv News
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास अंढेरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत पोलीस शिपाई भागवत गीरी आणि राम आंधळे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका दुचाकीवरून अवैध दारू घेऊन जाताना दोनजण दिसून आले. त्यांनी तात्काळ आपल्या दुचाकीने या दोघांचा पाठलाग केला असता दुचाकीजवळ आल्यावर अवैध दारू घेऊन जाणाऱ्या दोघांनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारून पाडलं. यात पोलीस कॉन्स्टेबल भागवत गिरी यांची दुचाकी खड्ड्यात जाऊन पडली आणि यात पोलीस शिपाई भागवत गिरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेले पोलीस शिपाई राम आंधळे गंभीर जखमी झाले आहेत. अवैध दारू व्यावसायिकांनी पोलीस शिपायाचा बळी घेतल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

इन्स्टाग्रामवर VIDEO करत विष प्यायला

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. प्रेयसीच्या विरहात प्रियकराने टोकाचं पाऊल उचललं. तरूणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. विष प्राशन करत असताना त्याने व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला. आधी तरूण दारू प्यायला, नंतर त्याने विष प्राशन केलं. ही धक्कादायक घटना बुलढाण्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथे घडली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Police constable Bhagwat Giri dies while chasing illegal liquor sellers
Thane News : गोठ्याला भीषण आग, २२ बकऱ्या होरपळल्या, अन्...; शेतकरी कुटुंबाचा हंबरडा

सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथील २५ वर्षीय तरूणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. समाधान लक्ष्मण आटोळे असं मृत तरूणाचं नाव आहे. त्याचे साक्षी समाधान आटोळेसोबत ३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर सिंदखेडराजा येथील उषा नारायण गावडे हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार विनोद नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Police constable Bhagwat Giri dies while chasing illegal liquor sellers
Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं वचन दिलंय, तर...; आदिती तटकरेंचं मोठं विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com