Thane News : गोठ्याला भीषण आग, २२ बकऱ्या होरपळल्या, अन्...; शेतकरी कुटुंबाचा हंबरडा

Murbad Cowshed Fire Animals Die : ठाण्यातील मुरबाड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरावळे गावातील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्यामुळे ६ म्हशी आणि ६ बैलांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Murbad Korwale village 22 goats and 6 bulls die in cowshed fire
Murbad Korwale village 22 goats and 6 bulls die in cowshed fireSaam Tv News
Published On

मयुरेश कडव, साम टीव्ही

ठाणे : मुरबाडमध्ये एका गोठ्याला भीषण आग लागली. या आगीत २२ बकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर ६ म्हशी आणि ६ बैलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावातील पुंडलिक धुमाळ या शेतकऱ्याच्या गोठ्याला ही आग लागली. त्यात या प्राण्यांचा जीव गेलायय.

मुरबाड तालुक्यातील अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. इथल्या कोरवळे गावातील शेतकरी पुंडलिक धुमाळ यांनीही आपल्या गोठ्यात गाई, म्हशी, बैल तसेच बकऱ्या पाळल्या आहेत. त्यांच्या गोठ्याला अचानकपणे आग लागली. या आगीत धुमाळ यांचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला. यात त्यांच्या पशुसंर्वधनाचंही नुकसान झालं. आगीत २२ बकऱ्यांचा मृत्यू झाला. तर ६ म्हशी आणि ६ बैल होरपळून जखमी झाले. आगीमुळे धुमाळ यांचं मोठं नुकसान झालंय. या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाकडून जखमी पशुंवर उपचार करण्यात आले. तर महसूल विभाकडून पंचनामा करण्यात आलाय. शासनाकडून या शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होतेय.

Murbad Korwale village 22 goats and 6 bulls die in cowshed fire
CM Devendra Fadnavis: प्रत्येकाला अग्नीपरीक्षेतून जावे लागते, मुख्यमंत्री फडणवीस असं का म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com