CM Devendra Fadnavis: प्रत्येकाला अग्नीपरीक्षेतून जावे लागते, मुख्यमंत्री फडणवीस असं का म्हणाले?

Maharashtra Politics: नाशिकमध्ये युवा उद्योजकांच्या वेस्टर्न रिजन कौन्सिल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहरातील युवा उद्योजकांसोबत संवाद साधला. त्यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
CM Devendra Fadnavis: प्रत्येकाला अग्नीपरीक्षेतून जावे लागते, मुख्यमंत्री फडणवीस असं का म्हणाले?
CM Devendra FadnavisSaam tv
Published On

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युवा उद्योजकांच्या समिटमध्ये सहभागी झाले. नाशिकमध्ये युवा उद्योजकांच्या वेस्टर्न रिजन कौन्सिल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहरातील युवा उद्योजकांसोबत त्यांनी संवाद साधला. या बैठकीमध्ये नाशिकच्या विकासावर आणि उद्योगावर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांवर चर्चा करत प्रश्नांची उत्तरं दिली. 'प्रत्येकाला अग्निपरिक्षेतून जावे लागते', असं त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 'प्रत्येकाला अग्नीपरिक्षेतून जावेच लागते. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकं म्हणायचे हा खूप पुढे जाईल. नंतर जेव्हा सरकार गेले तेव्हा म्हणाले फडणवीस संपले. पण आता सरकार आले तर म्हणायला लागले की लाँग टर्मचा घोडा आहे. प्रत्येकाला आपली औकात माहिती असते. मला पण माझी माहिती आहे.'

मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न आणि त्यांनी दिलेली उत्तरं यावर आपण नजर टाकणार आहोत...

१. कुंभमेळा अनुषंगाने तयारी कशी आहे?

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या संस्कृतीबाबत लोकांना महत्त्व पटत आहे. कुंभमेळ्याकडे आकर्षित होत आहेत. नाशिकमध्ये २०१५ चा कुंभमेळा हा चांगल्या पद्धतीने झाला. अनुचित प्रकार घडला नाही. येणारा कुंभमेळा हा सगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करू. हा आस्थाचा महाकुंभ होईल. टेक्निकली महाकुंभ होईल. इथली प्रशासकीय टीम सक्षम आहे. सर्व लोकं काम करतात. प्रयागराजचा अनुभव पाहता मी तिथे पोलिस कर्मचाऱ्यांसोबत पण संवाद साधला. त्या ठिकाणी १८ तास ड्युटी करत होते. कोणी कंप्लेंट करत नव्हतं ते म्हणत होते आम्हाला कुंभाने ताकद दिली.'

२. - नाशिकचा पालकमंत्री कोण असेल?

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'आम्ही नाशिकला पालकमंत्री देऊ. जोपर्यंत पालकमंत्री नसतात त्याचा चार्ज मुख्यमंत्र्यांकडे असतो.'

३. AI , IT टेक्नॉलॉजी कशी असणार महाराष्ट्रात?

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'आपण जेव्हा AI ची गोष्ट करतोय तर AI हे २२ करोड जॉब कमी करेल आणि २४ करोड वाढवेल असा सर्वे झाला. नवीन ऑपॉर्च्युनिटी तयार होत आहेत. स्मार्टफोन नवीन आले त्यावेळी लोकांना अडचणी आल्या. मात्र आता सर्व वापरत आहेत. देशाचे पूर्व अर्थमंत्री यांनी विचारले होते ८ रुपये ७५ पैसे मी डिजिटल करू शकतो का? आज होत आहे. पान टपरीवाला, भाजीवाला ठेलेवाला सगळे डिजिटल पेमेंट घेत आहेत.- AI च्या माध्यमातून नवीन स्किल डेव्हलप करू. टाटा इन्स्टिट्यूटने १० हजार महिलांना AI टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण सुरू केले आहे. AI चा उपयोग सांगितला पाहिजे त्याची भीती दूर केली पाहिजे. AI च्या माध्यमातून नवीन शिखरापर्यंत पोहचू शकू.'

४. ग्रामीण भागाला डेव्हलप करण्यासाठी कसे प्रयत्न असतील?

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'नाशिक हे कृषी इकॉनोमी आहे. १४००० कोटींचे द्राक्ष इथून एक्स्पोर्ट झाले आहेत. काही मॉडेल नाशिकला तयार केले आहेत. व्हॅल्यू चेंज मॉडल नाशिकला तयार केला आहे. जपानच्या केचप बनवणाऱ्या कंपनीसारख्या कंपनीने नाशिकच्या शेतकऱ्यांनी एग्रीमेंट केलं त्यांच्यासाठी पीक घेत आहे. कृषीला टेक्नॉलॉजीने जोडून घेतले पाहिजे. स्मार्ट ॲग्री बिजनेस योजना मी राज्यात सुरू केली. सगळ्या गावात क्रेडिट सोसायटी असते त्यांचं डिजिटल लाईजेशन करून मल्टीपर्पज सोसायटी करून ॲग्री बिझनेस सोसायटीत करू. सध्या १० हजार गावात काम सुरू आहे. शेतकऱ्याच्या हातात मार्केट न राहिल्यास अडचण निर्माण होते.'

५. कायदा सुव्यवस्था, नागपूरच्या घटनेवर प्रतिक्रिया -

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'नागपूरची घटना ४ तासांत नियंत्रणात आणली. दंगेखोरांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं. १०४ लोकांना ताब्यात घेतलं. सर्व नुकसानीच गणित करून ज्यांनी नुकसान केलं त्यांच्याकडून वसूल करू. त्यांच्या मालमत्ता विकून त्यांच्याकडून पैसे वसूल करू. जे करतील त्यांना भोगावे लागेल. मूर्ख लोकांना त्यांची जागा दाखवून देऊ.'

६. २०१९ ला उलट झालं त्यावेळी कशी मानसिकता होती?

मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी संयम ठेवला. ज्या पद्धतीने हल्ले माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर झाले. ज्या पद्धतीने मला अपमानित करता येईल त्याचा प्रयत्न झाला. मला माहित होतं मी त्यांच्यापेक्षा चांगला आहे. विचारण्यात येतात नाहीतर मग माणूस योगी होतो. माझ्यासोबत ताकद आहे विश्वास आहे कितीही खराब दिवस आले नकारात्मकता आली तरी मी त्यातून बाहेर येईल. दुसऱ्या दिवशी नवीन सूर्य उगवतो तेवढ्याच ताकतीने बाहेर पडतो.'

७. ज्यांनी आपल्याला वाईट बोलले ते आपले आज तारीफ करत आहेत त्याकडे कसे बघता?

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'आपल्याला किती ऐकायचे आणि किती नाही हे ठरवले पाहिजे. आम्ही निवडून आलो उद्धव ठाकरे निघून गेले लोक म्हणाले त्यांना द्यायला पाहिजे होतं. परत निवडून आलो लोक म्हणाले येतो लंबी रेस का घोडा आहे. कोणी कौतुक केलं तरी आपल्याला आपली औकात कळाली पाहिजे आणि ती मला माझी कळाले.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com