Sanjay Gaikwad News: मिरवणुकीत युवकांना मारहाण केल्याचा आरोप; व्हायरल व्हिडिओमुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत?

Sanjay Gaikwad News: शिवजयंतीच्या मिरवणुकीत संजय गायकवाड यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
MLA Sanjay Gaikwad
MLA Sanjay GaikwadSaam Digital
Published On

संजय जाधव, बुलढाणा|ता. १ मार्च २०२४

Buldhana Breaking News:

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर महिलेला धमकावून जमिन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीत युवकांना मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हे पुन्हा एकदा वादात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शिवजयंतीच्या मिरवणुकीत संजय गायकवाड यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड हे युवकांना मारत असल्याचे दिसत आहे.

बुलढाणा शहरातील (Buldhana) ही घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. या मिरवणुकीत आमदार गायकवाड यांनी बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आमदार संजय गायकवाड मारहाण करत असताना पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

MLA Sanjay Gaikwad
Bribe Case : चाळीस हजारांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या ताब्यात 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच संजय गायकवाड यांच्यावर जमिन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नागपूर येथील रीटा उपाध्याय यांनी राजूर येथील दीड एकर शेतजमीन बळकावल्याचा आरोप संजय गायकवाड यांच्यावर आहे. या प्रकरणात गायकवाड यांच्यासह त्यांचे पुत्र मृत्यूंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

MLA Sanjay Gaikwad
Vinayak Raut : आंबोली ग्रामस्थांच्या पाठिशी विनायक राऊत; अनधिकृत बांधकाम पाडण्याची केली मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com