Buldhana News: मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

MLA Sanjay Gaikwad News: बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांचे पुत्र मृत्यूंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sanjay Gaikwad
Sanjay GaikwadSaam Tv
Published On

संजय जाधव, बुलढाणा|ता. २९ फेब्रुवारी २०२४

Buldhana Breaking News:

बुलढाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांचे पुत्र मृत्यूंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेती बळकावल्याच्या आरोपाखाली दिवाणी व फौजदारी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यावर नागपूर येथील रीटा उपाध्याय यांनी राजूर येथील दीड एकर शेतजमीन बळकावल्याचा आरोप केला होता. त्या शेतावर आमदार संजय गायकवाड यांनी फार्म हाऊस बांधले आहे. तसेच संबंधित महिलेला जिवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आल्याचे समोर आले होते.

पोलिस कारवाई करत नसल्याने हे प्रकरण उच्च न्यायायात दाखल करण्यात आले होते. यावर मोताळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार आमदार गायकवाड यांच्यासह मृत्यूंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Gaikwad
Bhusawal News : पेपर अवघड गेल्याने बारावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

दरम्यान, दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मी १९८७ मध्ये वाघाची शिकार केली होती, तसेच त्याचा दातही गळ्यात घातल्याचे गायकवाड म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे वन विभागाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. (Latest Marathi News)

Sanjay Gaikwad
Shirdi Lok Sabha: शिर्डी लोकसभेची जागा कोण लढवणार? काँग्रेसच्या दाव्यामुळे ठाकरे गटाची धाकधूक वाढली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com