Bribe Case : चाळीस हजारांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या ताब्यात 

Dhule News : भावाच्या मृत्यूनंतर विमा प्रतिनिधीने पॉलिसीची रक्कम वारसाच्या नावे जमा न करता परस्पर दुसऱ्याच्या नावे केली. त्यामुळे आझादनगर पोलिसात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Bribe Case
Bribe CaseSaam tv
Published On

धुळे : लाचखोरीच्या प्रकरणात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला २०१३ मध्ये शिक्षा झाली होती. यानंतर याच पोलीस उपनिरीक्षकास पुन्हा ४० हजारांची लाच (Bribe) घेताना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे (Dhule) धुळे शहरात खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

Bribe Case
Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष देत ११ लाखात फसवणूक

संबंधित प्रकरणातील तक्रारदाराच्या चुलत भावाचे ऑगस्ट २०२१ मध्ये (Accident) अपघाती निधन झाले होते. चुलत भावाने त्याच्या हयातीत एचडीएफसी अ‍ॅग्रो या वीमा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची विमा पॉलिसी घेतली. भावाच्या मृत्यूनंतर विमा प्रतिनिधीने पॉलिसीची रक्कम वारसाच्या नावे जमा न करता परस्पर दुसऱ्याच्या नावे केली. त्यामुळे आझादनगर पोलिसात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक (Police) पोलिस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद याच्याकडे होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bribe Case
Sangola News : इमारतीला आग लागून भीषण स्फोट; एकाच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

फसवणुकीच्या या गुन्ह्यातील दुसऱ्याच्या नावे जमा झालेली व नंतर गोठविण्यात आलेली विम्याची रक्कम वारसांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी तक्रारदाराच्या वहिनीने न्यायालयात अर्ज केला. या अर्जावरून न्यायालयात सकारात्मक अहवाल देण्यासाठी तपास अधिकारी उपनिरीक्षक आरिफ सय्यद याने तक्रारदाराकडे ५० हजारांच्या लाचेची मागणी केली. या पार्श्वभूमीवर तक्रारदाराने २७ फेब्रुवारी २०२४ ला (Acb) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी तक्रारीची पडताळणी करत तथ्य आढळल्याने पारोळा रोडवरील एका पान शॉपजवळ उपनिरीक्षक आरिफ सय्यदला तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. त्याच्याविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com