Cyber Crime
Cyber CrimeSaam tv

Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष देत ११ लाखात फसवणूक

Jalgaon News : विशाल इंगळे यांना २१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान रामजी नावाने एकाने तीन वेगवेगळ्या व्हॉटस्‌ॲप क्रमांकावरुन कॉल आला. नंतर इंगळे यांना दोन नावाच्या इन्स्टाग्राम ॲपवर जॉईन करून घेतले.
Published on

जळगाव : शेअर बाजारात गुंतवणुक करण्याचे नाव सांगून मोबाईलवर अँप डाउनलोड करायचे सांगून ११ लाख ७५ हजाराला (Jalgaon) गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस (Cyber Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

Cyber Crime
Bike Theft : दुचाकी चोरून विकायच्या प्रयत्नात एकाला अटक; दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू

पाचोरा (Pachora) येथील गिरणा पंपिंग रोडवर विशाल प्रकाश इंगळे (वय ३८) हे कुटुंबासह वास्तव्यास आहे. विशाल इंगळे यांना २१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान रामजी नावाने एकाने तीन वेगवेगळ्या व्हॉटस्‌ॲप (Cyber Crime) क्रमांकावरुन कॉल आला. नंतर इंगळे यांना दोन नावाच्या इन्स्टाग्राम ॲपवर जॉईन करून घेतले. चॅटींगद्वारे आणि फोनवर वारंवार संपर्क साधून या संबंधितांनी काही कंपन्याचे आयपीओ आले असून ते खरेदी करण्यासाठी अगोदर एक ॲप्लिकेशन डाऊन लोड करायला लावले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cyber Crime
Buldhana News : बागायती क्षेत्र वगळल्याने शेतकऱ्यांचे गावातच बेमुदत उपोषण; पीकविमा मिळण्यासाठी मागणी

त्यानंतर एका मागून एक अशा वेगवेगळ्या वेळेस करुन दोन महिन्यांत तब्बल ११ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातला. सुरवातीच्या गुंतवणुकीवर नफा दिसल्यानंतर पण नंतर नफाही गायब आणि संपर्क करणारेही बेपत्ता झाल्याने फसवणूक झाल्याचे इंगळे यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी जळगावच्या सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक किशन नजन पाटील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com