Bike Theft : दुचाकी चोरून विकायच्या प्रयत्नात एकाला अटक; दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू

Gondia News : पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. मात्र त्याचा साथीदार कार्तिक बिसेन हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस करीत आहे.
Bike Theft
Bike TheftSaam tv
Published On

शुभम देशमुख 
गोंदिया
: गोंदिया शहरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरी करून त्या लपवून ठेवायच्या. यानंतर संधी साधून (Gondia) त्यांची विक्री करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून चोरलेल्या (Crime News) दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

Bike Theft
Sant Gadge Baba Amravati University : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना, अनाथांना मोफत शिक्षण; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा निर्णय

गोंदिया तालुक्यातील कटंगीटोला येथील दुर्गेश देवकरण भगत (वय २३) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर कार्तिक बिसेन (रा. रजेगाव) असे फरार आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोंदिया ग्रामीण व रावणवाडी परिसरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून दुर्गेश भगत याला एका दुचाकीसह अटक करण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bike Theft
Cabinet Decision: शेतकऱ्यांना मिळालं गिफ्ट! खरीप हंगाम होणार बहारदार, २४ हजार कोटी रुपयांच्या खतांसाठी अनुदान मंजूर

१५ दिवसांपूर्वी दुचाकी चोरी 

१५ दिवसांपूर्वी रावणवाडी येथील साई बार समोरून त्याचा साथीदार कार्तिक बिसेन याच्यासोबत दोघांनी मिळून दुचाकी चोरी (Bike Theft) केल्याची कबुली दुर्गेशने दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. मात्र त्याचा साथीदार कार्तिक बिसेन हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com