पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. सरकारने खरीप हंगामासाठी खत अनुदान वाढवण्यास मंजुरी दिलीय. खरीप हंगामासाठी २४ हजार कोटी रुपयांचं खत अनुदान मंजूर करण्यात आलंय. तसेच आसाममध्ये टाटा कंपनीच्या पॅकेजिंग प्लांटलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा समूहाच्या धोलेरा येथील सेमीकंडक्टर प्लांटला आणि CG Power च्या OSAT प्लांटलाही मान्यता देण्यात आलीय. (Latest News)
केंद्रीय माहिती आणि प्रसारण अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. एनबीएस योजनेंतर्गत ३ नवीन खत ग्रेड समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आलीय. तर खरीप हंगाम, २०२४ (०१-०४-२०२४ ते ३०-०९-२०२४ पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅश (पी आणि के) खतांवर २४,४२० कोटी रुपयांचे पोषण-आधारित अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जगात युरिया खताच्या किमती वाढल्या आहेत, परंतु सरकारने याचे दर वाढवले नसल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी दिलीय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
असे आहेत अनुदान
NBS धोरणांतर्गत पोषक अनुदानाचे दर वार्षिक किंवा द्विवार्षिक आधारावर निर्धारित केले जातात. ज्याच्या आधारावर २५ P&K खतांसाठी अंदाजे अनुदानाची गणना केली जाते. आगामी खरीप २०२४ हंगामासाठी नायट्रोजनसाठी ४७.०२ रुपये प्रति किलो, स्फुरदासाठी २८.७२ रुपये प्रति किलो, पोटॅशसाठी २.३८ रुपये प्रति किलो आणि सल्फरसाठी १.८९ रुपये प्रति किलो अनुदान निश्चित करण्यात आले आहे.
खतांची किंमत स्थिर
शेतकऱ्यांना खुशखबर देताना डीएपीच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. या खतांच्या किंमती स्थिर ठेवत शेतकऱ्यांना डीएपी जुन्या १,३५० रुपये प्रति बॅग दराने मिळेल. त्याचप्रमाणे,NPK जुन्या दराने १,४७० रुपये प्रति बॅग आणि MoP रुपये १,६७७ प्रति बॅग या दराने उपलब्ध होणार आहे. देशात उत्पादित होणाऱ्या आणि डीएपीला पर्याय असलेल्या सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर वाढवण्यासाठी एसएसपीवरील मालवाहतूक अनुदान सुरू ठेवण्यात येणार आहे. यामुळे आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खतांची उपलब्धता निश्चित करण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.