भीषण अपघात
Car Bike Accident At KhamgaonSaam Tv

Buldhana Accident: कामावरुन घराकडे परतत असताना काळाचा घाला; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

One Died In Car Bike Accident At Khamgaon: खामगाव तालुक्यात भीषण अपघात झालाय. कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झालाय.
Published on

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यात भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना समोर आलीय. हा भीषण अपघात खामगाव तालुक्यात झालाय. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय. आंबेटाकली गावाजवळ ही घटना घडल्याचं समोर आलंय.

कसा झाला अपघात?

राम गणपत महाजन आणि अनंता लाघे हे दोघे मोलमजुरीचे काम करतात. नेहमीप्रमाणे ते खामगाव तालुक्यातील आंबेटाकली येथे मोलमजुरीचे काम आटपून खामगाव येथे दुचाकीने चालले होते. त्यावेळी समोरून एक भरधाव कार आली आणि तिने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार राम गणपत महाजन जागीच ठार झाल्याची माहिती मिळतेय. तर अनंता लाघे यांची प्रकृती गंभीर (Car Bike Accident At Khamgaon) आहे.

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

अनंता लाघे त्यांच्यावर खामगाव येथील रुग्णाल्यात उपचार करण्यात (Buldhana News) आले. त्यानंतर त्यांना अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती केलंय. ही अपघाताची घटना १ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा घडली आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या अपघातामध्ये दुचाकीचा चुराडा झाल्याचं दिसत (Buldhana Accident) आहे.

 भीषण अपघात
Jalna Accident: जालन्यात थरारक अपघात! भरधाव आयशरने मायलेकीसह चौघांना उडवले, सहा वर्षाच्या चिमुकलीसह ३ ठार; चालक फरार

अकोल्यातील अपघात

राज्यातील हिट अँड रनच्या घटना वाढत आहेत. अकोल्यात एका भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक (Accident News) दिली. या घटनेत आई आणि मुलीचा मृत्यू झालाय तर बाप आणि मुलगा जखमी झाले आहेत. अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला होता. अपघातानंतर चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचं समोर आलंय. बाळापुर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती.

 भीषण अपघात
Akola Accident News: हिट अँड रनने अकोला हादरलं! अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; माय-लेकीचा करुण अंत; बाप-लेक जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com