Hospital
HospitalSaam tv

Buldhana News: बुलढाण्यात वसतीगृहातील विद्यार्थिंनींना अन्नातून विषबाधा; 6 जणांची प्रकृती चिंताजनक

Buldhana News: मुलींच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Published on

संजय जाधव

Buldhana News:

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीतून मोठी बातमी हाती आली आहे. मुलींच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वसतीगृहातील सहा मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या मुलींना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यासंदर्भात आमदार श्वेता महाले यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

चिखली येथील या शासकीय मुलींच्या वसतीगृहात गरीब कुटुंबातील 62 मुलींचा प्रवेश आहे. या वसतीगृहातील मुलींना अतिशय निकृष्टदर्जाचे अन्न दिले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

या मुलींना कोणतीही सुविधा याठिकाणी मिळत नाही. मुलींना साधं पिण्याचे शुद्ध पाणी नाही, भोजनात नेहमीच अळ्या पडलेल्या असतात, भाजीपालाही सडलेला असतो, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Hospital
Pandharpur News: पंढरपूरकरांचे आरोग्य धोक्यात; ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा?

या वसतीगृहात दोन विद्यार्थिंनींना झोपण्यासाठी एकच बेडचा वापर करावा लागतो. तसेच या विद्यार्थिंनींना गादी, चादरसुद्धा बदलून मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. '

या प्रकरणी समाजकल्याण विभागाचे अधिकाऱ्यांना सांगितले तर वसतिगृहाचे वॉर्डन अस्मिता जोशी या धमकी देतात, शिवाय विद्यार्थिंनींना वसतिगृहातील प्रवेशही रद्द करण्याची धमकी देतात. त्यामुळे मुली आजपर्यंत दबावाखाली जगत असून अन्याय सहन करत असल्याचेही समोर आले आहे.

या वसतीगृहासाठी राज्य सरकारचा समाज कल्याण विभाग लाखो रूपयांचा खर्च करते. तरीही मुलींना अळ्या पडलेले शिळे अन्न खाण्यास दिले जाते. त्यामुळे वॉर्डनवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Hospital
Nagpur Flood: नागपुरात 10 हजार घरांमध्ये शिरलं पाणी, 3 जणांचा मृत्यू; नुकसानग्रस्तांना 50 हजारांची मदत जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com