Nagpur Flood: नागपुरात 10 हजार घरांमध्ये शिरलं पाणी, 3 जणांचा मृत्यू; नुकसानग्रस्तांना 50 हजारांची मदत जाहीर

Nagpur Flood: नुकसानग्रस्त दुकानादारांना राज्य सरकारने ५० हजार रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती देवेद्र फडणवीस यांनी दिली.
Nagpur Flood
Nagpur FloodSaam tv

Nagpur Rain Update:

नागपुरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपुरातील पूर सदृश्य स्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पालिकेच्या मुख्यालयात महत्वाची आढावा बैठक सुरू झाली.

या बैठकीला नागपूर मनपा आयुक्त, नागपूर मनपा उपायुक्त आणि लोकप्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते. या बैठकीनंतर देवेद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नुकसानग्रस्त दुकानादारांना राज्य सरकारने ५० हजार रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती देवेद्र फडणवीस यांनी दिली. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आमची आढावा बैठक पार पडली आहे. नागपुरात कमी वेळात ११० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळं नागनदीचे पाणी अनेक वस्त्यांमध्ये शिरले. या पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर या पावसात 14 जनावरांना मृत्यू झाला आहे.

Nagpur Flood
Nagpur Rain News : नागपुरात पावसामुळे मोठे नुकसान! पुरामुळे रस्ते उखडले...

'मुसळधार पावसामुळे 10 हजार घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या दुकानदारांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये मदत देत आहोत. या दुकानांचं नुकसान झालेल्यांना 50 हजार रुपये, छोट्या दुकानदारांना 10 हजार मदत दिली जाईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

'नागपुरात आता काही पुलं नव्याने बांधले जातील. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. ज्यांच्या घरात पाणी शिरले, त्यांना जेवणाची व्यवस्था केली आहे. आज पुन्हा ऑरेंज अलर्ट आहे. आम्ही टीम तयार ठेवल्या आहेत. त्यांना अलर्ट दिला आहे. ज्या भागात वीज बंद केली होती, त्या ठिकाणाची वीज सुरू करण्यात आली आहे, अशीही माहिती फडणवीस यांनी दिली.

Nagpur Flood
Ahmednagar Rain Update: नगरला मुसळधार पावासाने झोडपले; शहरातील रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप, पुलाखाली कमरे इतकं पाणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com