HSC Exam 2023 Paper : बुलडाण्यात बारावीचा पेपर फुटला; परीक्षेआधीच गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

बुलडाण्यात बारावीच्या परीक्षेआधीच गणित विषयाचा पेपर फुटला आहे. सकाळी १० वाजेपासूनच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Buldhana Maths Paper
Buldhana Maths PaperSaam TV

Buldhana Maths Paper News : बुलडाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलडाण्यात बारावीच्या परीक्षेआधीच गणित विषयाचा पेपर फुटला आहे. सकाळी १० वाजेपासूनच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हा पेपर नेमका कुणी आणि कसा फोडला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

Buldhana Maths Paper
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांनी कसब्याचा गड कसा जिंकला?, ५ मुद्द्यांमधून मिळतील सगळ्या प्रश्नांची उत्तरे!

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्याच्या (Buldhana) सिंदखेडराजामध्ये सकाळी १०:३० वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गणिताचा पेपर परीक्षेआधीच अनेक विद्यार्थ्यांकडे पोहोचल्याचा संशय आहे. सिंदखेड राजा येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे.

याबाबतची अधिकृत माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून मिळालेली नाही. या पेपरफुटीनंतर आता बोर्ड याबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, पेपर फुटल्याने जिल्ह्यात मोळी खळबळ उडाली आहे.

Buldhana Maths Paper
Political News : संदीप देशपांडे हल्ल्यात आदित्य ठाकरे, संजय राऊतांचं नाव घेतलं; मनसे नेत्याच्या आरोपांनी खळबळ

विशेष बाब म्हणजे याआधी सुद्धा यवतमाळ जिल्ह्यात बारावीचा (HSC Exam) इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. तर हिंदी पेपरमध्ये चुका झाल्याचे पुढे आले होते. तर इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतानाही पुन्हा एकदा बारावीचा पेपर फुटल्याने परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com