Buldhana News: बुलढाणा जिल्हा हादरला! भरदिवसा गोळीबाराचा थरार; एकाचा मृत्यू, २ जखमी

Buldhana Rohana News: बुलढाण्यातील रोहणा गावात वैध शस्त्र खरेदी विक्रीच्या व्यवहारातून दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झालेत.
Buldhana Rohana News
Buldhana Rohana NewsSaamtv
Published On

संजय जाधव, बुलढाणा|ता. ७ डिसेंबर २०२३

Buldhana Breaking News:

बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाण्यातील रोहणा गावात वैध शस्त्र खरेदी विक्रीच्या व्यवहारातून दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झालेत. या भयंकर घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरुन गेला आहे. गोळीबारातील जखमींवर सध्या खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील रोहणा गावात आज (गुरूवार, ७ डिसेंबर) पारधी समाजातील दोन गटात तुफान राडा झाला. अवैध शस्त्र खरेदी विक्रीच्या व्यवहारातून हा वाद झाला. या वादात तिघांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. ज्यामधील एकाचा मृत्यू झाला.

घटनेत एक महिलाही जखमी झाली असून त्यांच्यावर सध्या खामगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ गावात धाव घेतली. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या भयंकर घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Buldhana Rohana News
Bjp vs Ajit Pawar Group: धुळे महापालिकेच्या 'या' निर्णयावरून अजित पवार गट आणि भाजप आमने-सामने

जमिनीच्या वादातून घडलं भयंकर, ५ जणांना चिरडले..

बिहारमध्ये जमिनीच्या वादातून मंगळवारी (६ डिसेंबर) भयंकर घटना घडली. बिहारच्या वैशालीत जमिनीच्या वादातून दोन गटात जोरदार राडा झाला. या दोन्ही गटाचा वाद इतका टोकाला गेला की, एका गटाने दुसऱ्या गटातील ५ जणांना ट्रॅक्टरने चिरडले. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana Rohana News
Income Tax Raid: आयकर विभागाची धाड... कारवाईत सापडले इतके पैसे; मोजता- मोजता मशीनही बंद पडले

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com