Bjp vs Ajit Pawar Group: धुळे महापालिकेच्या 'या' निर्णयावरून अजित पवार गट आणि भाजप आमने-सामने

Dhule Municipal Corporation: धुळे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाने धुळ्यात महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेतला. याविरोधात चक्क राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला आहे.
Dhule Municipal Corporation
Dhule Municipal CorporationSaam Tv
Published On

(भूषण अहिरे)

Dhule Municipal Corporation Bjp vs Ajit Pawar Group :

राज्यातील सत्तेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट वाटेकरी आहेत. पण स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षातील वाद असल्याचं समोर आले आहे. धुळे येथे अजित पवार गट आणि भाजप आमने-सामने आलेत. अजित पवार गटाने पालिकेवर धडक मोर्चा नेत भाजपला घरचा आहेर दिला. (Latest News)

धुळे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाने धुळ्यात महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेतला. या संदर्भात वाढीव मालमत्ता कर वाढीच्या नोटीस देखील संबंधित मालमत्ता धारकांना देण्यात आल्या आहेत.याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला आहे. भाजपा विरोधामध्ये महानगरपालिकेवर थेट राष्ट्रवादी अजित पवार गटाने धडक मोर्चा काढला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सत्ताधारी भाजपच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे, त्याचबरोबर गेल्या चार वर्षांपासून धुळे महानगरपालिकेवर भाजपच्या कार्यक्रमालीवरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. धुळे महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था असून पाण्याची देखील मोठ्या प्रमाणात समस्या नागरिकांना भेडसावत आहे. अशा परिस्थितीमध्ये सत्ताधाऱ्यांनी आणि पालिका प्रशासनाने मालमत्ता करवाढीचा घेतलेला निर्णय निषेधार्थ असल्याचं म्हणत, तात्काळ हा निर्णय मागे घेण्यात यावा.

अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा देखील इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी इर्शाद जहागीर यांनी दिला.

Dhule Municipal Corporation
BJP Victory : भाजपकडून विजयाचा जल्लोष; धुळे, बीडमध्ये फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com