आयकर विभागाने बुधवारी ( डिसेंबर) झारखंड आणि ओडीसा राज्यात मोठी कारवाई केली. बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये तीन राज्यांमध्ये विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत आयकर विभागाला 50 कोटींची रक्कम सापडली आहे. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोमध्ये 100, 200 आणि 500 च्या नोटांचे बंडल दिसत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने (IT Raid) ओडिशा आणि झारखंडमधील बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर छापे टाकले. ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूर आणि झारखंडमधील रांची, लोहरदगा या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. या कारवाईत तब्बल ५० कोटींची रक्कम मोजण्यात आली आहे. मात्र नोटांची संख्या जास्त असल्याने मशिनने काम करणे बंद केले होते.
करचुकवेगिरीच्या संशयावरून ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कार्यालयातून एवढी मोठी रोकड जप्त होऊनही प्रत्यक्षात करचोरी झाली की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या नोटांच्या मोजणीचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतरच नेमकी करचोरी किती आहे हे कळेल.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, ओडिशातील टिटीलागढ येथील दीपक साहू आणि संजय साहू या दोन मद्यविक्रेत्याच्या घरांचीही झडती घेण्यात आली. परंतु आयकर छापेमारीबाबत माहिती मिळाल्यानंतर दोन्ही व्यावसायिकांनी शहरातून पळ काढला. या दोन्ही मद्यविक्रेत्यांनी कोट्यवधी रुपयांचा आयकरही बुडवला असल्याचा आरोप आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.