Mumbai Crime: मुंबईत 'स्पेशल २६'... तोतया इन्कम टॅक्स अधिकारी बनून धाड टाकली अन् १८ लाख लुटले; ८ जणांना अटक

Crime News Update: तोतया इन्कम टॅक्स अधिकारी बनून व्यापाराच्या घरात धाड टाकून तब्बल 18 लाख रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईमधून समोर आला आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam TV
Published On

संजय गडदे, मुंबई|ता. ५ डिसेंबर २०२३

Mumbai Sion Crime News:

तोतया इन्कम टॅक्स अधिकारी बनून व्यापाराच्या घरात धाड टाकून तब्बल 18 लाख रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईमधून समोर आला आहे. सायन पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तब्बल आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? जाणून घ्या सविस्तर.

याबाबत समोर आलेली माहिती अशी, काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांचे कथित आयडी घालून काही जण सायन (Sion) येथील पटवा नावाच्या व्यापाराच्या घरी धडकले. धाडीच्या नावाखाली घरातील सगळे रोकड आणि संबंधित कागदपत्रे दाखवण्याच्या सुचना त्यांनी कुटुंबियांना दिल्या.

यावेळी पटवा नावाच्या या व्यापारी कुटुंबाने बहिणीच्या लग्नासाठी आणलेली असलेली तब्बल 18 लाख रुपयांची रोकड या 'अधिकाऱ्यां' समोर ठेवली. या बनावट अधिकार्यांनी नंतर कागदपत्रे तपासण्याचा बनावट केला, पैश्यांचे फोटो काढले आणि काही दिवसातच तपास पूर्ण करू मात्र तोवर कॅश जप्त करत असल्याच त्यांनी सांगितले आणि १८ लाख रूपये घेऊन पसार झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Crime News
Milk Price Issue: दूधदरासाठी पुण्यात रयत क्रांतीचा माेर्चा, संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर धडकली किसान सभा

या कारवाईनंतर चार दिवस उलटून देखील जेव्हा काहीच झालं नाही तेव्हा कुटुंबाने चौकशी केली तेव्हा ही सगळी बनावट असल्याच समोर आले आणि त्यांनी तात्काळ सायन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ तपासची चक्र फिरवली इमारतीतील तसेच परिसरातून सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासण्यास सुरुवात केली.

त्यांना या आरोपींच्या गाडीचा नंबर मिळाला आणि याच पुराव्याचा आधार घेत एक एक करून आठही आरोपींना पोलिसांनी अटक केली. तपासात कुटुंबातील एकाचा मित्राला घरातील लग्नाची तसेच घरात असलेल्या कॅशची माहिती होती आणि त्यानेच आरोपींना टीप दिल्याचे समोर येताच या मित्राला देखील पोलिसांनी अटक केली. (Latest Marathi News)

Mumbai Crime News
MP Election: EVM वर शंका? आमदारांना त्यांच्या गावात मिळाली फक्त ५० मते; काँग्रेसने नेत्याचे BJPवर गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com