बुलढाण्यात मध्यरात्री घराला आग
गॅस सिलिंडर स्फोटात ७ जण जखमी
शॉर्टसर्किट हे प्राथमिक कारण
अग्निशामक दलाने मोठा अनर्थ टाळला
संजय जाधव, बुलढाणा
बुलढाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. देऊळगावराजा तालुक्यातील दगडवाडी येथे एका येथील कारभारी नागरे यांच्या घराला मध्यरात्री अचानक घराला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली असल्याचे समोर आले. ही आग पसरल्यामुळे घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कारभारी नागरे यांच्या घराला मध्यरात्री अचानक घराला आग लागली. सुदैवाने घरी कोणीही नव्हते. यावेळी शेजारील व्यक्ती घरा बाहेर लघुशंकेसाठी आले, असता त्यांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी लगेच आरडाओरडा केल्याने शेजारी असलेल्या घरातील मंडळी झोपेतून उठली आणि धावपळ सुरू झाली.
काहींनी आग विझवण्याचं प्रयत्न केला. याचवेळी आग सर्वत्र पसरून घरात असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरावरचे टिन पत्रे व मोठमोठे दगडे फेकली गेली आणि मोठा आवाज झाल्याने एकच धावपळ ऊडाली. आग पसरू नये म्हणून नागरिकांनी तातडीने विजवण्याचा प्रयत्न केला. आग विजवताना त्यांना दुखापत झाली. यात अनेक जण एकमेकांच्या अंगावर पडले, तर कोणी रस्त्यावर पडले. या दुर्घटनेत ७ जण जखमी झाले आहेत.
अग्निशमक दल वेळेवर पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा शेजारी असलेल्या घरांना ही आग लागली असती. आगीच्या घटनेत घरामधील असलेले धान्यं व इतर महत्त्वाचे सामान , त्याच बरोबर घराचे छपरावर ठेवलेले स्पिंक्लर पाईप सुद्धा जळून गेले. तसेच घरातील इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.