भारत-बांगलादेश सीमेवर गोळीबार; गडचिरोलीच्या BSF जवानाला वीरमरण, देशरक्षणासाठी प्राणांची आहुती

BSF Jawan Suresh Ambadar Martyred On India Bangladesh Border: भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरीविरोधी मोहिमेदरम्यान गडचिरोलीचे सुपुत्र बीएसएफ जवान सुरेश आंबडर शहीद. वयाच्या ३५ व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान. मूळ गावी मरारटोला येथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार.
adchiroli Kurkheda Marartola BSF jawan Suresh Ambadar news
adchiroli Kurkheda Marartola BSF jawan Suresh Ambadar newssaam tv
Published On

भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरीविरोधी कारवाईदरम्यान गडचिरोली जिल्ह्याचे सुपुत्र आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान सुरेश दुर्गा आंबडर यांना वीरमरण आले आहे. पश्चिम बंगालमधील सीमावर्ती भागात कर्तव्य बजावत असताना संशयित घुसखोरांशी झालेल्या चकमकीत त्यांनी देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. ही दु:खद बातमी समजताच त्यांचे मूळ गाव मरारटोला (तालुका कुरखेडा) सह संपूर्ण गडचिरोली जिल्हयावर तीव्र शोककळा पसरली आहे.

adchiroli Kurkheda Marartola BSF jawan Suresh Ambadar news
Maharashtra Weather : आषाढी एकादशीला वरुणराजा बरसणार का? ४ दिवसाचा अंदाज आला समोर, IMD चा अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना?

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल येथील भारत बांगलादेश सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी बीएसतर्फे विशेष मोहीम राबवली जात होती. या मोहिमेत सहभागी असलेले जवान सुरेश आंबडर यांच्यावर संशयित घुसखोरांनी अचानक गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्यांनी देशाचे रक्षण करताना वीरमरण पत्करले.

adchiroli Kurkheda Marartola BSF jawan Suresh Ambadar news
CBSE new rules: सातवी ते नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सीबीएसई बोर्डाने परीक्षेचे नियम बदलले

शहीद सुरेश आंबडर यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. एक तरुण आणि कर्तव्यदक्ष जवान गमावल्यामुळे आंबडर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

adchiroli Kurkheda Marartola BSF jawan Suresh Ambadar news
Dry Day : शनिवारी महाराष्ट्रात ड्राय डे! 'या' कारणामुळे दारूची सर्व दुकाने आणि बार राहणार बंद

शहीद जवान सुरेश आंबडर यांचे पार्थिव लवकरच त्यांच्या मूळ गावी मरारटोला येथे आणण्यात येणार असून, त्यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com