Acterss Death: ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वात हळहळ

Acterss Death News: 'होम अलोन 2' आणि 'माय लेफ्ट फूट'मधील ऑस्कर विजेत्या आयरिश अभिनेत्री ब्रेंडा फ्रिकर यांचे 81 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सहा दशकाहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
Oscar-winning actress Brenda Fricker
Oscar-winning actress Brenda Fricker Saam Tv
Published On

Acterss Death News: ऑस्कर पुरस्कार विजेत्या आणि 'होम अलोन 2: लॉस्ट इन न्यूयॉर्क' या लोकप्रिय चित्रपटातील 'पिजन लेडी'च्या भूमिकेमुळे जगभर प्रसिद्ध झालेल्या आयरिश अभिनेत्री ब्रेंडा फ्रिकर यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले आहे. डब्लिन येथे काही काळ अल्प आजाराशी झुंज दिल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूडसह आयरिश चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

ब्रेंडा फ्रिकर यांना 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'माय लेफ्ट फूट' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात त्यांनी सेरेब्रल पाल्सीग्रस्त लेखक आणि चित्रकार क्रिस्टी ब्राउन यांच्या आईची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्या ऑस्कर जिंकणाऱ्या पहिल्या आयरिश अभिनेत्री ठरल्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत डॅनियल डे-लुईस प्रमुख भूमिकेत होते.

Oscar-winning actress Brenda Fricker
Batatyachi Chaal: पु. ल. देशपांडेंची 'बटाट्याची चाळ' नव्या रूपात; २१ कलाकार रंगभूमीवर सादर करणार भव्य संगीतप्रयोग

त्यानंतर 1992 मध्ये आलेल्या 'होम अलोन 2: लॉस्ट इन न्यूयॉर्क' या चित्रपटात त्यांनी साकारलेली 'पिजन लेडी' ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून गेली. मॅकॉले कल्किनसोबतचे त्यांचे भावनिक प्रसंग आजही चित्रपटप्रेमींना आठवतात. या भूमिकेमुळे त्यांना जागतिक स्तरावर मोठी लोकप्रियता मिळाली.

Oscar-winning actress Brenda Fricker
Rhiya Ahir: मुंबई पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहीर 'साम'वर; Exclusive मुलाखतीत काय म्हणाली?

ब्रेंडा फ्रिकर यांची अभिनय कारकीर्द तब्बल सहा दशकांहून अधिक काळाची होती. त्यांनी 90 हून अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. द फील्ड, अ टाइम टू किल, सो आय मॅरिड ॲन ॲक्स मर्डरर, व्हेरॉनिका गेरिन तसेच बीबीसीच्या Casualty मालिकेतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे त्या आयर्लंडमधील सर्वाधिक आदरणीय अभिनेत्रींपैकी एक ठरल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com