Dry Day : शनिवारी महाराष्ट्रात ड्राय डे! 'या' कारणामुळे दारूची सर्व दुकाने आणि बार राहणार बंद

Maharashtra Dry Day Update News : आषाढी एकादशीनिमित्त २५ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्रात राज्यभरात ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. दारूची दुकाने, बार आणि पब दिवसभर बंद राहणार असून, सरकारच्या निर्णयामागील कारण, एकादशीचे धार्मिक महत्त्व आणि संपूर्ण माहिती येथे वाचा.
MAHARASHTRA DRY DAY ON JULY 25: LIQUOR SHOPS, BARS AND PUBS CLOSED FOR ASHADHI EKADASHI 2026
MAHARASHTRA DRY DAY ON JULY 25: LIQUOR SHOPS, BARS AND PUBS CLOSED FOR ASHADHI EKADASHI 2026 Saam tv
Published On
Summary
  • २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे जाहीर

  • राज्यातील सर्व दारूची दुकाने, बार आणि पब दिवसभर बंद राहणार

  • कायदा-सुव्यवस्था लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला

तळीरामांनो विकेंडनिमित्त पार्टी करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी. शनिवारी, २५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशीनिमित्त ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील दारूची सर्व दुकाने, बार, पब दिवसभर बंद राहणार आहेत. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी बाहेर जाण्याचा किंवा मित्र-परिवारासोबत पार्टीचा बेत आखण्याआधी हे नक्की लक्षात ठेवा.

महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक सणांपैकी एक असलेल्या आषाढी एकादशीला लाखो भाविक भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. राज्यभरात मंदिरांमध्ये विशेष पूजा, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धार्मिक वातावरणाला गालबोट लागू नये यासाठी राज्य सरकारकडून ड्राय डे लागू केला आहे.

MAHARASHTRA DRY DAY ON JULY 25: LIQUOR SHOPS, BARS AND PUBS CLOSED FOR ASHADHI EKADASHI 2026
Women Purse : महिलांनी प्रवास करताना पर्समध्ये 'या' ६ वस्तू कधीच ठेवू नयेत, जाणून घ्या कारण नाहीतर....

हिंदू पंचांगानुसार, यंदा एकादशी तिथीची सुरुवात २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.१२ वाजता होईल आणि तिची समाप्ती २५ जुलै रोजी सकाळी ११.३४ वाजता होईल. एकादशी तिथी २५ जुलैच्या सूर्योदयाच्या वेळी अस्तित्वात असल्याने याच दिवशी देशभरातील भाविक उपवास आणि धार्मिक विधी करतील.

MAHARASHTRA DRY DAY ON JULY 25: LIQUOR SHOPS, BARS AND PUBS CLOSED FOR ASHADHI EKADASHI 2026
Kitchen Hacks : करपलेल्या भांड्यांवरचा काळपटपणा चुटकीसरशी होईल गायब, 'या' सोप्या टिप्स करून पहा

आषाढी एकादशीला महाराष्ट्रात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या दिवशी अनेक जण उपवास करतात, भगवान विठ्ठलाची पूजा करतात, तुळशीची पाने अर्पण करतात तसेच विष्णू सहस्रनाम, हरिपाठ आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन करतात. याच दिवसापासून चातुर्मास या चार महिन्यांच्या पवित्र कालखंडालाही सुरुवात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com