ST Bus Strike: राज्यातील एसटी कर्मचारी आजपासून संपावर जाणार; ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार, मागण्या काय?

ST Bus Strike In Maharashtra: एसटी महामंडळाचं शासनात विलीनिकरण करावं, या मागणीसाठी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत.
Breaking news st bus workers called strike from today in maharashtra see details
Breaking news st bus workers called strike from today in maharashtra see detailsSt Bus New and update - Saam tv
Published On

ST Bus Strike In Maharashtra

दिवाळीचा सण तोंडावर आला असताना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याची हाक दिली आहे. एसटी महामंडळाचं शासनात विलीनिकरण करावं, या मागणीसाठी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. आजपासून म्हणजेच ६ नोव्हेंबरपासून एसटी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Breaking news st bus workers called strike from today in maharashtra see details
Maratha Reservation: आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, मराठा म्हणूनच आरक्षण द्या; महिलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एसटी कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन (ST Bus Strike) केलं जाणार असल्याची नोटीस जनसंघाच्या अध्यक्ष जयश्री पाटील यांनी एसटी महामंडळाला रविवारी दिली आहे. त्यामुळं आता दिवाळीला एसटी बसने घरी जाणाची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, त्यांनी कामावर हजर राहावं, असं आवाहन महामंडळाकडून करण्यात आलं आहे. यापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अनेक महिने संप सुरू असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

दरम्यान, राज्य सरकारने हा संप मोडीत काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तब्बल ४ महिन्यांनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. मात्र, सरकारने कर्मचाऱ्यांची विलिनिकरणाची मागणी मान्य केलेली नव्हती. परंतु आता पुन्हा एकदा दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कामगार संपावर जाणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

एसटीचं शासनात विलिनिकरण, सातवा वेतन आयोग लागू करणे, शिस्त आवेदन पद्धती आणि अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचारी विविध शहरांमध्ये काम बंद ठेवून आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच आता आणकी एका आंदोलनाने जोर धरल्याने शिंदे-फडणवीस सरकारचं टेन्शन वाढलं आहे.

Breaking news st bus workers called strike from today in maharashtra see details
Maratha Reservation: आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, मराठा म्हणूनच आरक्षण द्या; महिलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com