Maratha Reservation: आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, मराठा म्हणूनच आरक्षण द्या; महिलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Satara News: आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, मराठा म्हणूनच आरक्षण द्या, अशी मागणी सातारा येथील मराठा समाजातील महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
Satara News We don't want Kunbi certificate give reservation as Maratha women demand to CM Eknath Shinde
Satara News We don't want Kunbi certificate give reservation as Maratha women demand to CM Eknath ShindeSaam TV
Published On

Maratha Reservation Satara News

आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, मराठा म्हणूनच आरक्षण द्या, अशी मागणी सातारा येथील मराठा समाजातील महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्राची मागणी थांबवावी, त्यांनी विनाकारण मराठा समाजात फूट पाडू नये, अशी विनंती देखील महिलांनी केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Satara News We don't want Kunbi certificate give reservation as Maratha women demand to CM Eknath Shinde
Maratha Reservation: कुणबी जातीचे पुरावे तपासणीसाठी समिती गठीत, जिल्हाधिकारी कार्यालयात ‘विशेष कक्ष’ स्थापन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) रविवारी सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी दरे गावात जनता दरबार घेतला. या दरबारात अनेक मराठा बांधव तसेच महिलांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण नको, मराठा म्हणूनच आरक्षण द्या, अशी विनंती महिलांनी केली.

मराठा समाज (Maratha Reservation) सुरुवातीपासूनच मोठ्या भावाची भूमिका बजावत आला आहे. ओबीसी बांधवांच्या तोंडातील घास आम्हाला हिरावून घ्यायचा नाही. आम्ही 96 कुळी मराठा असून कर्तृत्वावर मोठे होऊ, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपल्या कर्तृत्वावर स्वराज्य निर्माण केले होते, असं देखील मराठा समाजातील महिला म्हणाल्या.

मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन थांबवावं विनाकारण मराठा बांधव आणि ओबीसींमध्ये फूट पाडू नये, त्यांना कुणबी प्रमाणपत्र हवं असेल, तर त्यांनी ते विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठा बांधवांसाठी मागावं, आम्हाला ओबीसीमधून आरक्षण नको, अशी विनंती देखील महिलांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या जनता दरबारात नागरिकांच्या मागण्या तसेच तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, कोर्टात टिकणारे आरक्षण देऊ, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा बांधवांना दिला.

Satara News We don't want Kunbi certificate give reservation as Maratha women demand to CM Eknath Shinde
Rashi Bhavishya: अडचणी दूर होईल, प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, या राशींचे अच्छे दिन सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com