Shivsena NCP MLA Case: तारीख ठरली! शिवसेना- राष्ट्रवादीच्या आमदारांचा एकाच दिवशी 'फैसला' होणार; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Shivsena NCP MLA Disqualification Case: राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी एकाच दिवशी होणार आहे. दोन्ही सुनावण्या एकापाठोपाठ एक ऐकल्या जातील, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Shivsena NCP MLA Case: ब्रेकिंग! सेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा एकाच दिवशी फैसला; ७ ऑगस्टला 'सर्वोच्च' सुनावणी
Shiv Sena And NCP MLA Disqualification Case Saam Tv
Published On

दिल्ली, ता. ३० जुलै २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी एकाच दिवशी होणार आहे. ७ ॲागस्ट रोजी एकाच दिवशी एकापाठोपाठ एक या दोन्ही सुनावण्या पार पडणार आहेत.

Shivsena NCP MLA Case: ब्रेकिंग! सेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा एकाच दिवशी फैसला; ७ ऑगस्टला 'सर्वोच्च' सुनावणी
Ulhasnagar Politics : राजकीय घडामोडींना वेग; कलानी गट पुन्हा शरद पवार गटात जाणार? उल्हासनगरात महायुतीचं टेन्शन वाढणार?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी शरद पवार गट आणि ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी याचिका जाहीर केली होती. शिंदे गट तसेच अजित पवार गटातील आमदारांना अपात्र करावे अशी मागणी यामधून करण्यात आली होती.

गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी होत नव्हती. अखेर या दोन्ही सुनावण्यांची तारीख आता सुप्रीम कोर्टाने जाहीर केली आहे. ७ ऑगस्ट रोजी शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची सुनावणी पार पडेल, दोन्ही सुनावण्या एकापाठोपाठ एक ऐकल्या जातील, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Shivsena NCP MLA Case: ब्रेकिंग! सेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा एकाच दिवशी फैसला; ७ ऑगस्टला 'सर्वोच्च' सुनावणी
Pune Hit And Run Case: अपघात झाला तुम्हाला कसं कळलं? सुनील टिंगरे यांची पोलिसांकडून तब्बल ४ तास चौकशी

दरम्यान, याआधी सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणीला सप्टेंबर महिन्यातील तारीख दिली होती. तर काल झालेल्या राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीत दोन्ही प्रकरणे एकदाच ऐकू असे म्हणत ३ ऑगस्टची तारीख दिली होती. त्यानंतर आता शिवसेनेची सुनावणीही त्याचदिवशी घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे.

Shivsena NCP MLA Case: ब्रेकिंग! सेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा एकाच दिवशी फैसला; ७ ऑगस्टला 'सर्वोच्च' सुनावणी
Jalna Accident: जालन्यात थरारक अपघात! भरधाव आयशरने मायलेकीसह चौघांना उडवले, सहा वर्षाच्या चिमुकलीसह ३ ठार; चालक फरार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com