Sangli News: मोठी बातमी! शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे; शहरात सायकल रॅलीचे आयोजन

Sangli Latest News: 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा बंद माघे घेण्यात आला असल्याचे जाहीर केले. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगैरे असल्याने शिवप्रतिष्ठांनी हा निर्णय घेतला आहे.

Sangli News: मोठी बातमी! शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे;  शहरात सायकल रॅलीचे आयोजन
Sangli Latest News: Saam TV
Published On

सांगली, ता. २२ ऑगस्ट २०२४

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून २५ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेला सांगली बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. बांगलादेशमधील सत्तासंघर्षानंतर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाल्याचे समोर आले होते. याचा निषेध म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने सांगली बंदची हाक दिली होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला असून आता शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे.


Sangli News: मोठी बातमी! शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे;  शहरात सायकल रॅलीचे आयोजन
Pune News: सेल्फी काढला, नातेवाईकांना पाठवला अन् आयुष्य संपवलं, खडकवासला धरणात उडी मारुन विद्यार्थ्याची आत्महत्या

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांगलादेश येथील हिंदू अत्याचार थांबवा या मागणीसाठी 25 ऑगस्ट रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानकडून सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या सांगली बंदचा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. या संदर्भातील निवेदन देण्यासाठी आज संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रतिष्ठांनकडून सांगलीत मोटरसायकल रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

शिवतीर्थपासून या मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली. यावेळी खुद्द संभाजी भिडे गुरुजी यांनीही या मोटरसायकल रॅलीत सहभाग घेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यानंतर संभाजी भिडे गुरुजी व अन्य पाच कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा बंद माघे घेण्यात आला असल्याचे जाहीर केले. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगैरे असल्याने शिवप्रतिष्ठांनी हा निर्णय घेतला आहे.


Sangli News: मोठी बातमी! शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे;  शहरात सायकल रॅलीचे आयोजन
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपाआधीच रस्सीखेच सुरू; नागपुरातील ६ जागांवर ठाकरे गटाचा दावा, कॉंग्रेस आक्रमक

आपल्या हिंदू बांधवांवर बांगलादेश येथे होत असणाऱ्या अत्याचाराविरोधात केंद्र सरकारने कडक पाऊल उचलावे. प्रशासन काय कारवाई करते ते पाहून पुढचा निर्णय घेणार असल्याचे संभाजी भिडे यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांनी बांग्लादेशमधील अत्याचाराचा निषेध करत संताप व्यक्त केला होता. बांगलादेशमधील हिंदूंचे स्थलांतर होता कामा नये, त्यांना संरक्षण मिळावे, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली होती. याचविरोधात शिवप्रतिष्ठानकडून सांगली बंदची हाक देण्यात आली होती.


Sangli News: मोठी बातमी! शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे;  शहरात सायकल रॅलीचे आयोजन
Mumbai Crime News : ऐकावं ते नवलच! पोलिसांच्याच घरी टाकला डाका, दरोडेखोराने १३ पोलिसांची घरं फोडली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com