Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे नियोजन; कुठून कधी धावणार ट्रेन? जाणून घ्या वेळापत्रक

Centarl Railway Ashadhi Ekadashi Special Train : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी १६ विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.
ASHADHI WARI 2026: CENTRAL RAILWAY ANNOUNCES 16 SPECIAL TRAINS FOR PANDHARPUR PILGRIMS
ASHADHI WARI 2026: CENTRAL RAILWAY ANNOUNCES 16 SPECIAL TRAINS FOR PANDHARPUR PILGRIMSSaam tv
Published On
Summary
  • मध्य रेल्वेकडून आषाढी वारीसाठी १६ विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा

  • भुसावळ, नागपूर,अमरावती, खामगाव येथून पंढरपूरसाठी विशेष गाड्या धावणार

  • वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला

पावसाचं आगमन झालं की चाहूल लागते ती आषाढी वारीची, ओढ लागते पंढरीच्या पांडुरंगाची. अनेक वारकरी या कालावधीत याची देही याची डोळा हा सोहळा पाहण्यासाठी उत्सुक असतात. पंढरीच्या विठुरायाला भेटायला जाण्यासाठी महिनाभर आधीच तयारी करतात. या वारकऱ्यांच्या आनंदात मध्य रेल्वेने देखील भर घातली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे. भुसावळ-पंढरपूर, नागपूर-मिरज, नवी अमरावती-पंढरपूर आणि खामगाव-पंढरपूर या मार्गांवर एकूण १६ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे खान्देशातील तसेच विदर्भातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ-पंढरपूर दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११५९ ही २४ आणि २५ जुलै रोजी भुसावळ येथून दुपारी १.३० वाजता सुटून पंढरपूरकडे रवाना होईल. तर गाडी क्रमांक ०११६० ही २५ आणि २६ जुलै रोजी पंढरपूर येथून रात्री १०.३० वाजता सुटणार आहे. या गाड्यांना जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

ASHADHI WARI 2026: CENTRAL RAILWAY ANNOUNCES 16 SPECIAL TRAINS FOR PANDHARPUR PILGRIMS
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

याशिवाय नागपूर-मिरज विशेष रेल्वे गाडी क्रमांक ०१२०५ ही २३ आणि २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१२०६ ही २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचणार आहे. नवी अमरावती-पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०१११९ ही २१ व २४ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता नवी अमरावतीहून सुटेल. तर परतीची गाडी क्रमांक ०११२० ही २२ व २५ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजता पंढरपूरहून रवाना होईल.

ASHADHI WARI 2026: CENTRAL RAILWAY ANNOUNCES 16 SPECIAL TRAINS FOR PANDHARPUR PILGRIMS
Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

खामगाव-पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०११२१ ही २१ व २३ जुलै रोजी खामगावहून सकाळी ११.३० वाजता सुटेल. तर गाडी क्रमांक ०११२२ ही २२ व २४ जुलै रोजी पंढरपूरहून पहाटे ५ वाजता सुटणार आहे. आषाढी वारीसाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरकडे रवाना होत असल्याने या विशेष रेल्वे सेवा प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार असून गर्दीचे नियोजन करण्यासही मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com