Yavatmal News: ब्रेकअपमुळे प्रियकर संतापला; प्रेयसीच्या घरात घुसून केलं भयानक कृत्य, पोलिसांत गुन्हा

Yavatmal Crime News: सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रेयसीने अचानक प्रेमसंबंध तोडले. त्यामुळे प्रियकराला राग अनावर झाला.
Boyfriend beats married girlfriend out of anger over breakup in Yavatmal
Boyfriend beats married girlfriend out of anger over breakup in Yavatmal Saam TV
Published On

संजय राठोड, साम टीव्ही

Yavatmal Crime News

सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रेयसीने अचानक प्रेमसंबंध तोडले. त्यामुळे प्रियकराला राग अनावर झाला. या रागातून त्याने थेट प्रेयसीचं घर गाठलं. तू माझ्याशी का बोलत नाहीस, माझा फोन का उचलत नाहीस, असं म्हणत त्याने मध्यरात्री प्रियसीच्या घरात घुसून राडा घातला. इतकंच नाही, तर सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Boyfriend beats married girlfriend out of anger over breakup in Yavatmal
Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणातील बडा मासा पोलिसांच्या जाळ्यात; ससून रुग्णालयात मोठी खळबळ

ही धक्कादायक घटना यवतमाळ (Yavatmal News) वणी पोलीस ठाणे परिसरात घडली. याप्रकरणी विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विवाहित असून तिला दोन मुली आहे.

पतीसोबत पटत नसल्याने तक्रारदार महिला ६ वर्षांपासून विभक्त राहते. यादरम्यान, महिलेचे चिखलगाव येथील एका व्यक्तीसोबत (वय ४०) प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही सातत्याने एकमेकांना भेटत होते. मात्र, अलिकडे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याने प्रेयसी प्रियकराला टाळू लागली.

प्रियकराकडून सातत्याने येणाऱ्या कॉलला महिला त्रस्त झाली होती. अखेर तिने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. ही बाब लक्षात येताच प्रियकर संतापला. त्याने रविवारी रात्री प्रेयसीचे घर गाठले. तू माझा नंबर का ब्लॉक केला, असं म्हणत त्याने मध्यरात्री घरात राडा घातला.

इतकंच नाही, तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी सुद्धा दिली. या घटनेनंतर महिलेने तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Boyfriend beats married girlfriend out of anger over breakup in Yavatmal
Maharashtra Rain Update: राज्यासाठी पुढील ४८ तास अतिमहत्वाचे; 'या' जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीटीचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com