नितीन पाटणकर, साम टीव्ही
ललिल पाटील ड्रग्ज प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील कर्मचारी महिंद्र शेवते याला अटक केली आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयात असताना त्याची सर्व कामे शेवते बघत होता. याशिवाय रुग्णालयात आणलेल्या कैद्यांची तो चांगलीच सोय ठेवत होता, अशी माहिती समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पुण्यातील ससून रुग्णालयात घडलेले ड्रग्स प्रकरण राज्यभरात गाजलं आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या अनेक आरोपींना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. तर ललित पाटील याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिसांना बडतर्फे देखील करण्यात आलं आहे.
परंतु या प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी दोषी असून त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही, असा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असून, मुख्य आरोपीची पाठराखण केली जात केली जात आहे, असंही धंगेकर यांनी म्हटलं होतं.
इतकंच नाही, तर आपण राज्य सरकारसह पोलिसांच्या विरोधात बुधवारी पोलिस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत दिला होता. दरम्यान, आमदार रवींद्र धंगेकर यांच्या इशाऱ्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत.
पोलिसांनी ससून रुग्णालयातील कर्मचारी महिंद्र शेवते याला अटक केली आहे. शेवते याला अटक होताच आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. शेवते याच्यासोबत या प्रकरणात कुणाचा हात होता याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.