Maharashtra Rain Update: राज्यासाठी पुढील ४८ तास अतिमहत्वाचे; 'या' जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीटीचा इशारा

Maharashtra Rain News: नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे.
IMD warns of unseasonal rain and hail in Maharashtra in next 48 hours
IMD warns of unseasonal rain and hail in Maharashtra in next 48 hoursSaam TV
Published On

Weather Alert in Maharashtra

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतीपिकाचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच हवामान खात्याने पावसासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IMD warns of unseasonal rain and hail in Maharashtra in next 48 hours
Mumbai News: दुचाकीवरून तोल गेला अन् अनर्थ घडला; आईच्या वाढदिवशीच ११ महिन्यांचं बाळ दगावलं

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

'या' जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीटीचा इशारा

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे नागपूर विभागातही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. अकोला आणि बुलढाण्यात देखील आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी शेतपिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

मुंबईसह पुण्याला अवकाळी पावसाचा इशारा

दुसरीकडे मुंबईसह पुणे विभागाला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ठाण्यालाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

IMD warns of unseasonal rain and hail in Maharashtra in next 48 hours
Rashi Bhavishya: या राशींच्या व्यक्तींचे भाग्य बदलणार, जुनी इच्छा पूर्ण होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com